उद्धव ठाकरेंना दुसरा धक्का! अहिल्यानगरमधील ‘हा’ दिग्गज नेता हाती घेणार धनुष्यबाण; पक्षप्रवेश कन्फर्म

उद्धव ठाकरेंना दुसरा धक्का! अहिल्यानगरमधील ‘हा’ दिग्गज नेता हाती घेणार धनुष्यबाण; पक्षप्रवेश कन्फर्म

Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीत पानिपत झाल्यानंतर महाविकास आघाडीतील ठाकरे गटाची अवस्था सैरभैर झाली आहे. आतापर्यंत अनेक दिग्गज नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता पक्षांतर अधिक वेगाने होत आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे ओढा वाढला आहे. आताही ठाकरे गटाला दुसरा मोठा धक्का अहिल्यानगरात बसणार आहे. काही दिवसांपूर्वी अहिल्यानगर शहरातील ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. आता नगर तालुक्यात ठाकरे गटाला दुसरा धक्का बसला आहे. तालुक्यातील दिग्गज नेते माजी जिल्हा परिषद  सदस्य संदेश कार्ले धनुष्यबाण हाती घेणार आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर नगर जिल्ह्यातील राजकारण बदललं आहे. एकेकाळी नगर शहरात तब्बल 25 वर्षे शिवसेनेचा आमदार होता. पण आता याच नगर शहरात शिवसेना कमकुवत दिसू लागली आहे.  मागील काही दिवसांपूर्वी शहरातील जुन्याजाणत्या शिवसैनिकांनी मुंबई गाठून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. यानंतरही ठाकरे गटाला लागलेली गळती थांबलेली नाही.

आमदारकीचं आमिष.. काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याकडून दीड लाख उकळले, अहिल्यानगरमधील धक्कादायक प्रकार

उद्याच करणार करणार प्रवेश

संदेश कार्ले यांचा शिंदे गटातील पक्षप्रवेश निश्चित झाला आहे. उद्या कार्ले त्यांच्या कार्यकर्त्यांसह मुंबईत येऊन एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करतील. संदेश कार्ले नगर तालुक्यातील शिवसेनेचे फायरब्रँड नेते म्हणून ओळखले जातात. नगर तालुका आणि आसपासच्या तालुक्यात त्यांचा जनसंपर्क चांगला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कार्ले यांनी पारनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक देखील लढली होती. जिल्हा परिषद सदस्यपदाच्या माध्यमातून त्यांचा जिल्हा परिषदेतील कार्यकाळ  उल्लेखनीय राहिला आहे.

शिवसैनिकांच्या बैठकीत घेतला निर्णय : कार्ले

आज नगर तालु्क्यातील शिवसैनिकांचा बैठक घेतली. या बैठकीत निर्णय झाला की उद्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार आहोत. विधानसभा निवडणुकीत जागावाटपात ज्या ठिकाणी शिवसेनेची ताकद आहे त्या जागा शिवसेनेला मिळणं अपेक्षित होतं. पण या जागा मिळाल्या नाहीत. त्यामुळे शिवसैनिकांत नैराश्य आले. सत्तेत जाऊन लोकांची कामं केली पाहिजेत. म्हणून उद्या आम्ही एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहोत. स्व. बाळासाहेबांचा धनुष्यबाण आधीही आमच्याकडे होता आणि आताही राहणार आहे. त्यामुळे पक्षप्रवेश करतोय असं काही नाही. फक्त सत्तेबरोबर जाऊन लोकांची सेवा आणि कर्तव्य समजून आम्ही उद्या एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहोत, असे संदेश कार्ले म्हणाले.

कोकणात ठाकरेंना धक्का बसणार? बडा नेता शिंदेंच्या गळाला; उदय सामंतांनी प्रवेशाची थेट तारीखच सांगितली 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube