आमदारकीचं आमिष… काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याकडून दीड लाख उकळले, अहिल्यानगरमधील धक्कादायक प्रकार

Congress woman office bearer cheated In Ahilyanagar : गेल्या काही महिन्यांपूर्वी राज्यामध्ये विधानसभा निवडणुका या पार पडल्या. मात्र विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळवून देतो, असं आश्वासित करून काँग्रेस ( Congress) पक्षाच्या ओबीसी समन्वयक मंगल भुजबळ यांची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना अहिल्यानगरमध्ये (Ahilyanagar) घडली आहे.
भुजबळ यांच्याकडून टोकन म्हणून दिड लाख रुपये घेतल्याचा भुजबळ यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँगेस शरद पवार पक्षाच्या युवक प्रदेश उपाध्यक्ष बालराजे पाटील यांच्यावर कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
हा प्रश्न आहे का? जय पवारांबद्दल विचारताच, शरद पवार पत्रकारांवर भडकले
याबाबत सविस्तर माहिती अशी की, महाविकास आघाडीकडून नगर शहर विधानसभेच्या उमेदवारीसाठी अनेकजण इच्छुक होते. काँग्रेसकडून मंगला भुजबळ या देखील रेसमध्ये होत्या. आपल्या तिकीट मिळावे, यासाठी त्यांनी देखील प्रयत्न (Crime News) केले होते. विधानसभा निवडणुकीत नगर शहर विधानसभेची जागा काँग्रेसला सुटणार असून, तुम्हाला मी तिकीट मिळवून देतो, असे पाटील यांनी सांगत आपली फसवणूक केल्याचे भुजबळ यांनी तक्रारीत म्हटलं आहे.
नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या सविस्तर
विधानसभा निवडणुकीमध्ये अहिल्यानगर शहराची जागा महाविकास आघाडीच्या जागा वाटपात राष्ट्रवादी शरद पवारांकडे गेली. राष्ट्रवादीने या जागेसाठी माजी महापौर अभिषेक कळमकर यांची उमेदवारी जाहीर केली. मात्र नाव जरी जाहीर झाले, तरी त्यांना तिकीट मिळणार नाही, ही जागा काँग्रेसलाच मिळणार. मात्र, त्यासाठी तुम्हाला पक्षाला फंड द्यावा लागेल, असे पाटील यांनी सांगितलं होतं.
चार लाख गुंतवणूकदारांना दिलासा! ज्ञानराधाच्या कुटे विरोधात ईडीचे आरोपपत्र, पैसे परत मिळण्याची शक्यता
त्यानुसार पाटील यांच्या शब्दावर विश्वास ठेवून टप्प्याटप्प्याने एकुण 1.5 लाख रुपये त्यांच्या बँक खात्यावर पाठवले होते. परंतू अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने अभिषेक कळमकर यांनाच उमेदवारी दिली होती. त्यानंतर मंगल भुजबळ यांनी बालराजे पाटील याला दिलेले पैसे परत मागितले, परंतु त्याने टाळाटाळ करण्यास सुरूवात केली, त्यामुळे फसवणूक झाल्याचे मंगल भुजबळ यांनी तक्रारीत म्हटले आहे.