Nilesh Lanke News : येणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election) अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यातील दक्षिण मतदारसंघामध्ये भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी असाच सामना पाहायला मिळणार. भाजपकडून सुजय विखे (Sujay Vikhe Patil) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर लोकसभेची तयारी करत असलेले निलेश लंके (Nilesh Lanke) हे देखील गुरुवारी राष्ट्रवादीचे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून समजते आहे. यामुळे नगर दक्षिणेमध्ये सुजय विखे विरुद्ध निलेश लंके असा लोकसभेचा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
“मला दोन पक्षांच्या ऑफर, राज ठाकरेंचाही फोन आला होता”, पण… वसंत मोरेंनी सगळंच सांगितलं
लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय हालचालींना वेग प्राप्त झाला आहे. यातच नुकतीच भाजपची लोकसभेची दुसरी यादी जाहीर झाली आहे. नगर दक्षिणेमधून पुन्हा एकदा सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर झाली. तर सुजय विखे यांच्या विरुद्ध प्रतिस्पर्धी कोण असणार? अशी चर्चा देखील रंगली होती. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे निलेश लंके हे देखील लोकसभेची जोरदार तयारी करत होते. लंके यांचा शरद पवार गटात प्रवेश होऊन ते नगर दक्षिणेतून शरद पवार गटाचे उमेदवार असणार अशा चर्चा देखील रंगल्या होत्या.
‘शैतान’ चा चौथ्या दिवशी वेग मंदावला; सोमवारी मात्र सिनेमाने केली इतक्या कोटींची कमाई
महायुतीमध्ये अजित पवार गटात असलेले आमदार निलेश लंके गुरुवारी शरद पवार यांच्या गटात प्रवेश करणार असून तुतारी चिन्हावर ते लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरतील अशी खात्रीशीर माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात लंके विरुद्ध विखे अशी लढत पाहायला मिळेल आणि ही लढत आता चुरशीची होणार आहे.
आजही अवकाळी पावसाची शक्यता कायम, ७ राज्यांना बसणार तडाखा, महाराष्ट्रात कसं असेल हवामान?
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून भाजपची दुसरी यादी कधी जाहीर होणार याकडे राज्याचे लक्ष लागलेले होते. त्याचबरोबर विरोधकांचे देखील लक्ष लागून होते. आमदार निलेश लंके हे भाजपच्या यादीची वाट पाहत होते. अखिल भाजपची दुसरी यादी जाहीर झाली व सुजय विखे पाटील हे भाजपचे उमेदवार ठरले. यामुळे आता लंके हे उद्याच शरद पवार गटात प्रवेश करणार असून तुतारी चिन्हावर ते लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरतील अशी खात्रीशीर माहिती हाती येत आहे.