Ahmednagar pilgrimage place in Mukhyamantri Tirtha Darshan Yojana : मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेत (Mukhyamantri Tirtha Darshan Yojana) अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील चार तीर्थ स्थानांचा समावेश झाल्याने पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्ह्याच्या तिर्थक्षेत्र पर्यटन विकासासाठी सुरू केलेल्या कामाला पाठबळ मिळाले आहे.
राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर पालकमंत्री ना.विखे यांनी पहील्याच जिल्हा नियोजन विकास समितीच्या बेठकीत जिल्ह्याच्या तिर्थक्षेत्र पर्यटनाच्या दृष्टीने आराखडा तयार करून रोजगार निर्मिती करण्याचे जाहीर केले होते. त्यादृष्टीने जिल्ह्याचा तिर्थक्षेत्र पर्यटन विकास आराखडा तयार करून कामही सुरू झाले.
Ahmednagar Rain : नगरमध्ये मुसळधार, तर जामखेडमध्ये ढगफुटी; पिंपळवाडीचा पूल खचला
याचाच एक भाग म्हणून श्रीक्षेत्र नेवासे येथील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदीर परीसर विकास आरखड्याची महायुती सरकारने अर्थसंकल्पात घोषणा केल्याने ना.विखे पाटील यांनी याठिकाणी उभारण्यात येणार्या ज्ञानेश्वर सृष्टीच्या संकल्पनेला बळ मिळण्याचा मार्ग अधिक सुकर झाला आहे.शिर्डी येथे साईबाबांच्या जीवनावर थीम उभारण्यासाठी ना.विखे पाटील यांच्या प्रयत्नामुळे निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली असल्याने थीम पार्कचा आराखडा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
यंदा ११३ जणांचा चमू ‘Paris’ गाजवणार; कधी, केव्हा अन् कधीपर्यंत?, वाचा भारताचं A टू Z वेळापत्रक
जिल्ह्यातील तिर्थस्थानाच्या विकासाचा आराखडा तयार होत असतानाच महायुती सरकारने राज्यातील जेष्ठ नागरीकांसाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री तिर्थ दर्शन योजनेमुळे जिल्ह्याच्या तिर्थक्षेत्र पर्यटन विकासाच्या संधी अधिक निर्माण होण्याच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
Jui Gadkari : मराठमोळ्या जुई गडकरीचा साडीतील मोहक लुक
राज्य सरकारच्या योजनेत देशातील ७३ आणि राज्यातील ६४ तिर्थस्थानांचा समावेश आहे. जिल्ह्यातील शिर्डी शनिशिंगणापूर भगवानगड आणि सिध्दटेक गणपती या तिर्थस्थानाचा या महत्वपूर्ण ठिकाणाचा समावेश झाल्याने या ठिकाणी भाविकांची गर्दी अधिकच वाढणार आहे.विशेष म्हणजे यासर्व योजनेत सहभाग घेणार्या जेष्ठ नागरीकांसाठी अर्थिक तरतूद मोठ्या प्रमाणात केल्याने योजनेला प्रतिसाद पाहाता तिर्थस्थानाच्या ठिकाणी रोजगार निर्मिती मध्ये सुध्दा वाढ होईल.
पालकंमंत्री विखे पाटील यांनी जिल्ह्याच्या दृष्टीने घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयात जिल्ह्यातील तरूणांनायरोजगार हाच विषय अधिक महत्त्वाचा मानून त्यावर सुरू केलल्या कामाला मुख्यमंत्री तिर्थ दर्शन योजनेची मिळणारी जोड अधिक रोजगार उपलब्धतेच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरेल.