Dhule Accident : राज्यात रस्ते अपघातांचे प्रमाण सातत्याने (Dhule Accident) वाढत चालले आहेत. या अपघातात अनेकांचा मृत्यू आहे. भरधाव वेगातील (Road Accident) वाहनांमुळेच अपघात होत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. आताही असाच भीषण अपघात धुळे जिल्ह्यात (Dhule News) घडला आहे. शिंदखेडा तालुक्यातील दसवेल फाट्याजवळ हा अपघात घडला आहे. पिकअप व्हॅन आणि ईको गाडी यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. शिंदखेडा तालुक्यातील दसवेल फाट्यानजीक मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. मयतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. या अपघातातील जखमींना तातडीने धुळ्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
बोलेरो-ट्रकचा भीषण अपघात! एकाच गावातील तीन युवक ठार; गावावर शोककळा
मिळालेल्या माहितीनुसार, वारुळ गावातून धार्मिक कार्यक्रम आटोपून ही मंडळी ईको गाडीतून घरी निघाली होती. त्याचवेळी दसवेल फाट्यानजीक त्यांच्या गाडीला पिकअप व्हॅनने जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला होता. या दुर्घटनेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर काह जण जखमी झाले. या जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना धुळ्यातील हिरे वैद्यकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी या जखमींवर तातडीने उपचारास सुरुवात केली. या अपघातात पिकअप चालकाने मद्यपान केले होते का याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या अपघाताने मात्र धुळे जिल्ह्यावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, रस्त्यांवर वाहनांचा वेग भरधाव (Road Safty) असतो. त्यामुळे वाहन नियंत्रित करणे सहजासहजी शक्य होत नाही. रस्त्यावर अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी सातत्याने केली जात आहे. अपघातांची संख्या कमी करण्यासाठी या उपाययोजनांची गरज आहे. उपाययोजना प्रत्यक्षात अंमलात आणण्याचीही गरज आहे. अपघात रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्या तरी या महामार्गावर अपघात सातत्याने होत आहेत. उपाययोजना प्रत्यक्षात अंमलात आणण्याचीही गरज आहे. परंतु त्यानुसार कार्यवाही होताना दिसत नाही. त्यामुळे रस्ते अपघातांच्या संख्येत सातत्याने वाढ होत चालली आहे.
भीषण अपघात! तेल टँकर अन् ट्रकची धडक, अपघातात 48 जण ठार; तर सुमारे 50 गुरे जिवंत जळाली