Download App

Lok Sabha Election दरम्यान युती-आघाडींचे आरोप-प्रत्यारोप; भाजपच्या जाहिरातींवरून थोरातांचा हल्लाबोल

Lok Sabha Election Mahayuti MVA Accusations start : लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम ( Lok Sabha Election ) जाहीर झाला असून आता सभा, कार्यक्रमांच्या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका टिपण्णी करत आहे. नुकतेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच भाजपाच्या ( BJP ) फसव्या जाहिरातबाजीला लोक कंटाळले असून राज्यात महायुतीच्या विरोधात मोठी लाट आहे. येत्या काळात पुन्हा एकदा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येईल असा विश्वास देखील थोरात यांनी व्यक्त केला.

तब्बल 20 वर्षांनंतर मिटलं इमरान- मल्लिकाचं भांडण; दोघांचा वाद का झाला होता? जाणून घ्या

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी संगमनेरच्या अमृता लॉन्समध्ये आयोजित महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीला उपस्थित राहून उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार लहू कानडे यांच्यासह महाविकास आघाडीच्या सर्व मित्र पक्षांचे विविध पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Punit Balan Group चा स्तुत्य उपक्रम; राज्य अजिंक्य स्पर्धेतील खेळाडूंना इलेक्ट्रिक बाईक

यावेळी बोलताना थोरात म्हणाले, गेल्या १० वर्षापासून केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे पण भाजपचे नेते प्रचारसभांमध्ये सरकारने केलेल्या कामांवर काहीच बोलत नाहीत कारण भाजप सरकारने काही ठोस कामचं केलं नाही त्यामुळे भाजपचे नेते धार्मिक मुद्दे पुढे करत आहेत. या सरकारच्या काळात महिला, तरुण, शेतकरी, कष्टकरी, दलित अल्पसंख्यांक, मजूर मध्यमवर्गीय कोणीही समाधानी नाही. महागाई गगनाला भिडली असून बेरोजगारी ऐतिहासीक उच्चांकी पातळीवर गेली आहे असा शाब्दिक टोलाही थोरातांनी लगावला.

तसेच पुढे बोलताना थोरात म्हणाले, भाजपाच्या फसव्या जाहिरातबाजीला लोक कंटाळले असून राज्यात महायुतीच्या विरोधात मोठी लाट आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला मोठे यश मिळणार असून अहमदनगर जिल्ह्यात अत्यंत चांगले वातावरण आहे. आपसातील मतभेद दूर करून सर्वांनी एक महिनाभर अत्यंत चांगले नियोजन करा. जनकल्याणाचा महाविकास आघाडीचा विचार सर्वांनी घराघरात पोहोचवावा असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

follow us