बॉलिवूडचं सर्वात हॉट कपल पुन्हा एकत्र… तब्बल 20 वर्षांनी मिटलं इम्रान अन् मलिकामधील अंतर

बॉलिवूडचं सर्वात हॉट कपल पुन्हा एकत्र… तब्बल 20 वर्षांनी मिटलं इम्रान अन् मलिकामधील अंतर

Emraan Hashmi Mallika Sherawat Hug: इमरान हाश्मी (Emraan Hashmi ) आणि मल्लिका शेरावत (Mallika Sherawat ) यांच्यातील भांडण सर्वांनाच माहिती आहे. 20 वर्षांपूर्वी मर्डर चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान इम्रान आणि मल्लिका यांच्यात जोरदार भांडण झाले होते. आता अखेर सर्व काही विसरून इम्रान आणि मल्लिका पुन्हा मित्र बनले आहेत. दोघांचा मिठी मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर (social media) व्हायरल होत होते. त्यामुळे त्यांच्यात चांगलंच वादाची ठिणगी पडली होती. आता निर्माते आनंद पंडित यांच्या मुलीच्या रिसेप्शनमध्ये इम्रान आणि मल्लिका यांचे पुनर्मिलन पाहायला मिळाले. दोघेही गुरुवारी मुंबईतील लग्नाच्या रिसेप्शनमध्ये भेटले. जिथे दोघांनीही रेड कार्पेटवर एकत्र पोज दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)


लग्नाच्या रिसेप्शनमध्ये इमरान हाश्मी आणि मल्लिका शेरावत एकमेकांकडे बघून हसले आणि नंतर एकमेकांना मिठी मारली. इम्रान आणि मल्लिका यांना मिठी मारताना पाहून चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. यानंतर दोघेही रेड कार्पेटवर गेले आणि पोज दिली.

चाहत्यांची कमेंट

इम्रान आणि मल्लिकाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर चाहते भरपूर कमेंट करत आहेत. एकाने लिहिले आहे की, ती खूपच सुंदर दिसत आहे. तर दुसऱ्याने लिहिले आहे की सर्वोत्कृष्ट जोडी.. तर आणखी एकाने लिहिले की, इम्रान लाजत आहे.

मल्लिकाच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर तिने गुलाबी रंगाचा गाऊन घातला होता, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती, तर इम्रानच्या लूकबद्दल बोलायचे तर त्याने काळ्या रंगाचा सूट घातला होता. ज्यामध्ये तो खूपच हँडसम दिसत होता.

अजयच्या ‘मैदान’ला प्रेक्षकांची अधिक पसंती, वाचा पहिल्या दिवशी किती झाली कमाई

‘मर्डर’च्या सेटवर झाली होती भांडण

इम्रान आणि मल्लिका यांच्या ‘मर्डर’ सिनेमाला मोठा फटका बसला. जरी दोघेही सेटवर एकमेकांशी बोलत नव्हते. 2021 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत मल्लिकाने इमरानसोबतच्या तिच्या भांडणाबद्दल सांगितले होते. मल्लिका म्हणाली की, ‘आम्ही बोललो नाही आणि आता मला वाटते की ते खूप बालिश होते. मला वाटतं की चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी आमच्यात गैरसमज झाला होता. माझ्याकडूनही ते खूप विचित्र आणि बालिशपणा झाले होते. मी पण काही कमी नाही. मल्लिका पुढे म्हणाली की, आता भांडणाबद्दल हसत असली तरी आम्ही दोघे देखील आता एकमेकांच्या संपर्कात नाहीत.अशी प्रतिक्रिया अभिनेत्रीने दिली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज