Download App

आमदार प्राजक्त तनपुरे मैदानात! मतदारसंघात विकासकामांचा धडाका…

राहुरी मतदारसंघातील शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी विकासकामांचा धडाका सुरू ठेवला आहे.

Ahmednagar News : राज्यात येणाऱ्या काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणुका (Maharashtra Elections) आहेत मात्र त्याआधीच आता लोकप्रतिनिधी आपापल्या मतदारसंघातील प्रलंबित विकासकामे पूर्णत्वाकडे घेऊन जात आहेत. राहुरी मतदारसंघातील शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे (Prajkt Tanpure) यांनी विकासकामांचा धडाका सुरू ठेवला आहे. अनेक ठिकाणी कामांचा शुभारंभ करण्यात आला आहे. ही कामे लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्याकडे देखील त्यांचा भर राहणार आहे. दरम्यान आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या मतदारसंघामध्ये सद्यस्थितीत कोट्यवधींची विकासकामे सुरू असून यामुळे नागरिकांना फायदा होणार आहे, असे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.

राहुरी तालुक्यातील कात्रड येथील विविध विकासकामांचे लोकार्पण आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या कामांसाठी १ कोटी ८४ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यातून रस्ते, जिल्हा परिषद शाळेच्या नवीन खोल्या अशी कामे झाली आहेत. या कामांचा ग्रामस्थांना उपयोग होईल, याचे समाधान आहे. राहुरी तालुक्यातील चेडगाव येथील महेश तरवडे वस्ती ते गोपाळवस्ती शिवरस्ता मजबुतीकरण करण्यात येणार आहे. या कामासाठी २० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या कार्याचे भूमिपूजन आज ग्रामस्थांच्या समवेत करण्यात आले. या रस्त्यामुळे स्थानिकांच्या दळणवळणाची मोठी गैरसोय दूर होणार आहे आणि याबाबत मी फार समाधानी आहे असे तनपुरे म्हणाले.

फक्त घोषणा अन् जाहिरातबाजी प्रत्यक्षात मात्र..,; प्राजक्त तनपुरेंनी जुनं सगळं उकरुन काढलं

पाथर्डी मतदारसंघातील सातवड येथील विविध विकासकामांचे भूमिपूजनही यावेळी करण्यात आले. या कामांसाठी ४८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये जिल्हा परिषद शाळेची नवी इमारत, रस्ते व इतर कामे हाती घेण्यात आली आहेत. हे काम वेळेत पूर्ण होऊन नागरीकांची सोय होईल याचे समाधान आहे. तालुक्यातील सोमठाणे खुर्द गावात मांडवे ते कराळे वस्ती रस्ता खडीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. या रस्त्यासाठी सुमारे १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण होऊन रस्ता नागरिकांसाठी उपलब्ध होईल असे आमदार तनपुरे म्हणाले.

पाथर्डी तालुक्यातील घाटशिरस गावांत सुमारे २ कोटी ९६ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा सर्व गावकऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यात प्रामुख्याने गावातील प्रमुख रस्ते, पडोळे वस्तीवरील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात पेव्हर ब्लॉक बसवणे आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नवीन खोल्यांचे बांधकाम या कामांचा समावेश आहे अशा पद्धतीने मतदारसंघात विकास कामे सुरू असून ती लवकर पूर्ण देखील होतील असा विश्वास आमदार प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केला.

अजित पवार येऊ अथवा शरद पवार.. तनपुरे कारखान्यावर कर्डिले स्पष्टच बोलले

follow us