Download App

राहुरी मंदिर वाद प्रकरण; अबू आझमींचा ताफा पोलिसांनी रोखला…

राहुरी तालुक्यातील गुहामध्ये मंदिराच्या जमिनीवरुन सुरु असलेल्या वादाप्रकरणी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी घटनास्थळी भेट देण्यासाठी आले होते. मात्र, अबू आझमी यांचा ताफा पोलिसांनी रोखल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे अबू आझमी यांना घटनास्थळी भेट देता आली नाही. यावेळी गावकऱ्यांनीही आझमी यांना चांगलाच विरोध केल्याचं दिसून आलं आहे.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्याल तर सरकारला सत्तेतून खेचू; प्रकाश शेंडगेंचा इशारा

नेमकं प्रकरण काय?
गुहा येथील कानिफनाथ देवस्थानाचा वाद आता पुन्हा उफाळून आला आहे. 13 नोव्हेंबर रोजी अमावस्येनिमित्त सुरू असलेल्या पूजा आणि धार्मिक कार्यक्रमात एका समाजाच्या पुरुष तसंच महिलांच्या जमावानं मंदिरात शिरून पूजारी आणि भाविकांना मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेनंतर गुहामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली. कानिफनाथ देवस्थानावरून दोन समाजात गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. याबाबत न्यायालयात खटला देखील दाखल आहे.

कोकण रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, ‘या’ तारखेपूर्वी करा अर्ज, जाणून घ्या कोण करू शकतं अर्ज?

प्रशासनानं दोन्ही समाजाच्या ज्येष्ठ लोकांच्या अनेक वेळा बैठका घेऊन तोडगा काढण्यासाठी प्रयत्नही केले. यावर दोन्ही समाजाला मान्य होतील असा तात्पुरता तोडगा देखील काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, अद्यापही तोडगा निघालेला नसल्यानं हा वाद वारंवार उफाळून येत असल्याचं पाहायला मिळत आहे.

Devendra Fadanvis : मी त्यांचे भाषणच ऐकले नाही, भुजबळ-जरांगे वादावर बोलणे फडणवीसांनी टाळले

काही दिवसांपूर्वीच राहुरीतील गुहामध्ये मंदिराच्या जमिनीच्या वादातून पुजाऱ्यांना मारहाण झाल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणाचा वाद आता नव्या वळणार येऊन ठेपला आहे. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी आज गुहा येथे भेट देण्यासाठी जाणार होते. मात्र, गावात दाखल होण्याआधीच पोलिसांनी आझमींच्या गाड्यांचा ताफा रोखला आहे. अबू आझमी यांना पोलिसांनी गुहा गावात न जाण्याची विनंती केली. पोलिसांसह गावकऱ्यांनी आझमींना गावात न येऊ देण्याची भूमिका घेतलीयं.

‘आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित, आगामी अधिवेशनात यावर…’; सुप्रिया सुळेंची लोकसभा अध्यक्षांकडे मागणी

गुहा गावात याआधीही अनेकदा दोन समुदायांमध्ये किरकोळ कारणावरुन वाद झाल्याचं समोर आलं आहे. गावात हिंदुधर्मीयांची एकूण 8 मंदिरं असून 1 मशीद आहे. तर 2 बौद्ध विहारांसह 1 जैन मंदिर अस्तित्वात आहे. गावातील कोणत्याही धार्मिक स्थळांवर भोंगे नाहीत. गावातील धार्मिक स्थळांसह, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रमांनाही भोंगे लावण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. या संपूर्ण वादाच्या घटनांनंतर गावात सुरु असलेला वाद लवकरात लवकर मिटवण्यात यावा, अशी भावना सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.

Tags

follow us