Download App

“..तर मी राजकारणातून संन्यास घेईन”; संतापाच्या भरात अजितदादांचं कुणाला चॅलेंज

मी वेष बदलून दिल्लीला जात होतो हे साफ खोटं आहे. कुणीही काहीही बडबडतं त्यांना लाज वाटली पाहिजे.

Ajit Pawar : ‘मी वेष बदलून दिल्लीला जात होतो हे साफ खोटं आहे. कुणीही काहीही बडबडतं त्यांना लाज वाटली पाहिजे. मी जिथे जातो तिथे नेहमीच उजळ माथ्याने जातो. मी कधीच नाव बदलून प्रवास केलेला नाही. विरोधकांकडून आता पुन्हा फेक नरेटिव्ह पसरवण्याचं काम केलं जात आहे. जर हे सिद्ध झालं तर मी राजकाराणातून संन्यास घेईन’, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी संताप व्यक्त केला आणि विरोधकांना चॅलेंजही दिलं. त्यांचा सगळा रोख खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याकडेच होता. अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांंशी संवाद साधत विरोधकांकडून सुरू असलेल्या आरोपांवर सडेतोड उत्तरं दिली.

शरद पवार-अजित पवार एकत्र येतील; पण काही महत्वाकांक्षी नेत्यांना.. सुनिल शेळकेंचा रोख कुणाकडं?

अजित पवार महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याआधी अनेकदा दिल्लीला गेले होते. येथे त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर बैठका घेतल्या होत्या. या बैठकीसाठी अजित पवार मास्क आणि टोपी घालून हजर राहत होते असा खुलासा अजितदादांनीच काही दिवसांपूर्वी केला होता. यानंतर विरोधी पक्षांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. वेष बदलून प्रवास, नावात बदल करून प्रवास केला असे आरोप विरोधी पक्षांनी केले होते. अशा पद्धतीने एखादा दहशतवादी आला तर काय, विमानतळांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली होती.

या आरोपांनंतर आज अजित पवार यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले. मी वेष बदलून दिल्लीला जात होतो हे साफ खोटं आहे. कुणीही काहीही बडबडतं त्यांना लाज वाटली पाहिजे. मी जिथे जातो तिथे नेहमीच उजळ माथ्याने जातो. मी कधीच नाव बदलून प्रवास केलेला नाही. विरोधकांकडून आता पुन्हा फेक नरेटिव्ह पसरवण्याचं काम केलं जात आहे. वेष बदलून दिल्लीला गेल्याचे आरोप सिद्ध झाले तर मी राजकाराणातून संन्यास घेईन, असे उत्तर अजितदादांनी दिले.

Pune Porsche accident मध्ये आमदार टिंगरेंना अभय; चार तास चौकशी पण चार्जशीटमध्ये नाव नाही

राज्यात एका पक्षाचं सरकार येणं अशक्य आहे. विकास आणि समान कार्यक्रमांवर आम्ही लक्ष देतो. विद्यमान जागा ज्या पक्षाची त्यालाच ती जागा मिळणार. मात्र विशिष्ट सिंटिंग जागांची अदलाबदल शक्य असेल. भुजबळ आणि मी एक कुटुंब म्हणून काम करतो. मी सुद्धा अनेकदा तरुण चेहऱ्यांना संधी दिली. निलेश लंकेंनाही मीच संधी दिली होती. आताही आम्ही नव्या चेहऱ्यांना संधी देणार आहोत, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

follow us