Download App

नाशिक शिक्षक मतदारसंघ : विखे पाटलांची तलवार म्यान, विवेक कोल्हेंचा महायुतीविरोधातील अर्ज कायम

विधानपरिषदेच्या नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीतून राजेंद्र विखे यांनी माघार घेतली.

Nashik Teacher Constituency Election : विधानपरिषदेच्या नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. या मतदारसंघात उमेदवारी मागे घेण्याच्य शेवटच्या दिवशी मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नांना यश आलं. त्यांचे बंधू राजेंद्र विखे यांनी अखेर निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराच्या अडचणी कमी झाल्या आहेत. दरम्यान, या मतदारसंघात विवेक कोल्हे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी कायम ठेवल्याचे दिसत आहे. त्यामुळे मतदारसंघातील लढत रंगतदार अवस्थेत आली आहे.

 विखे-कोल्हे संघर्षाचा नवा अंक; नाशिक शिक्षक मतदारसंघात राजेंद्र विखेंचा कोल्हेंविरोधात शड्डू?

नगर जिल्ह्यातील उत्तरेच्या राजकारणात विखे विरुद्ध कोल्हे हा संघर्ष आपण आजवर पहिला आहे. आता पुन्हा एकदा हे दोन प्रतिस्पर्धी आमने सामने येणार होते. माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे सुपुत्र विवेक कोल्हे यांनी नाशिक शिक्षक मतदारसंघातून आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर त्यांना शह देण्यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे यांचे बंधू डॉ. राजेंद्र विखे हे आता सरसावले होते. परंतु, त्यांनी माघार घेतल्याने ही संभाव्य लढत टळली आहे.

नाशिक विभागातील शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर झाल्या असून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. 7 जून अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. 26 जूनला मतदान होणार आहे. मात्र यंदाच्या निवडणुकीत नगर जिल्ह्यात पुन्हा एकदा दोन कुटुंबातील संघर्ष समोर येणार आहे. या निवडणुकीत विखे यांचे विरोधक समजले जाणारे विवेक कोल्हे या निवडणुकीच्या मैदानात आहेत. तर त्यांना शह देण्यासाठी प्रवरा एज्युकेशन ट्रस्टचे प्रमुख डॉ. राजेंद्र विखे पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार होते. विखे पाटील यांच्या उमेदवारीने या मतदारसंघात अतिशय तीव्र राजकीय लढाई होण्याची शक्यता आता मावळली आहे.

नाशिकमध्ये राडा! आमदार किशोर दराडेंकडून अपक्ष उमेदवार दराडेंना मारहाण

विखेंच्या माघारीनंतर आता या मतदारसंघात महाविकास आघाडीचे संदीप गुळवे, महायुतीचे किशोर दराडे आणि अपक्ष विवेक कोल्हे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राजेंद्र विखे यांच्यासह एकूण पंधरा उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. तरी देखील 21 उमेदवार अजूनही रिंगणात आहेत. यापैकी फक्त प्रमुख तीन उमेदवारांतच खरी लढत होणार आहे.

follow us

वेब स्टोरीज