विखे-कोल्हे संघर्षाचा नवा अंक; नाशिक शिक्षक मतदारसंघात राजेंद्र विखेंचा कोल्हेंविरोधात शड्डू?

विखे-कोल्हे संघर्षाचा नवा अंक; नाशिक शिक्षक मतदारसंघात राजेंद्र विखेंचा कोल्हेंविरोधात शड्डू?

Ahmednagar Politics : साखरसम्राटांच्या नगर जिल्ह्याचं राजकारण राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या (Ahmednagar Politics) भोवतीचं फिरतं. विखे काँग्रेसमध्ये असतानाही या दोन्ही नेत्यांत संघर्षाच्या ठिणग्या पडतच होत्या. त्यानंतर कोपरगाव तालुक्यातील कोल्हे आणि विखे यांच्यातील राजकीय संघर्षही नगरकरांनी पाहिला. आता याच संघर्षात पुढील अंक विधानपरिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत पहायला मिळण्याची शक्यता आहे.

नगर जिल्ह्यातील उत्तरेच्या राजकारणात विखे विरुद्ध कोल्हे हा संघर्ष आपण आजवर पहिला आहे. आता पुन्हा एकदा हे दोन प्रतिस्पर्धी आमने सामने येणार आहेत. माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे सुपुत्र विवेक कोल्हे यांनी नाशिक शिक्षक मतदारसंघातून आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर त्यांना शह देण्यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे यांचे बंधू डॉ. राजेंद्र विखे हे आता सरसावले आहेत. या निवडणुकीत ते देखील आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले जात आहे. या निवडणुकीच्या रिंगणात विखे उतरत असल्याने पुन्हा एकदा विखे विरुद्ध कोल्हे हा संघर्ष राजकीय आखाड्यात पाहायला मिळणार आहे.

Ahmednagar Lok Sabha Election : यंदा अहमदनगर.. शिर्डीमध्ये कमी मतदान, फटका कोणाला?

नाशिक विभागातील शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर झाल्या असून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. 7 जून अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. 26 जूनला मतदान होणार आहे. मात्र यंदाच्या निवडणुकीत नगर जिल्ह्यात पुन्हा एकदा दोन कुटुंबातील संघर्ष समोर येणार आहे. या निवडणुकीत विखे यांचे विरोधक समजले जाणारे विवेक कोल्हे या निवडणुकीच्या मैदानात आहेत. तर त्यांना शह देण्यासाठी प्रवरा एज्युकेशन ट्रस्टचे प्रमुख डॉ. राजेंद्र विखे पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. विखे पाटील यांच्या उमेदवारीने या मतदारसंघात अतिशय तीव्र राजकीय लढाई होण्याची शक्यता आहे.

‘गणेश कारखाना’…अन् विखे-कोल्हे संघर्ष

नगर जिल्ह्याच्या राजकारणात विखे विरुद्ध कोल्हे कुटुंबियांचा राजकीय संघर्ष हा सर्वश्रुत आहे. यातच गेल्या काही महिन्यापूर्वी झालेल्या गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत युवा विवेक कोल्हे यांनी राज्याचे महसूलमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पॅनेलचा 17 विरुद्ध 1 असा पराभव केला होता. विशेष म्हणजे कोल्हे यांनी या निवडणुकीत विखे यांचे कट्टर विरोधक असलेले बाळासाहेब थोरात यांचा पाठिंबा घेत विखे यांच्य पॅनलचा या निवडणुकीत पराभव केला होता.

आता शिक्षक मतदार संघाच्या या निवडणुकीत संजीवनी शिक्षण संस्थेचे प्रमुख विवेक कोल्हे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या विरोधात राजेंद्र विखे यांनी उमेदवारी केल्यास नगर जिल्ह्यातील पारंपारिक राजकीय संघर्ष दिसून येईल. हे दोघेही भाजपचे नेते आहेत. मात्र हा मतदारसंघ महायुतीच्या जागा वाटपात एकनाथ शिंदे गटाला देण्यात आला आहे. अशा स्थितीत उमेदवारी कोणाला आणि मुख्य लढत कोणामध्ये होणार याची उत्सुकता वाढत आहे.

अहमदनगर जिल्हा दुष्काळमुक्त करणार! डॉ. सुजय विखेंना साथ द्या -फडणवीस

लोकसभा निवडणुकीतही कोल्हे ठरले डोकेदुखी

देशात लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जून रोजी जाहीर होणार आहे. नगर जिल्ह्यात यंदाची नगर दक्षिण लोकसभा चांगलीच चुरशीची ठरतेय. महाविकास आघाडीकडून निलेश लंके तर महायुतीकडून सुजय विखे हे लोकसभेच्या रिंगणात आहे. विखे यांना शह देण्यासाठी लंकेंच्या मदतीसाठी विवेक कोल्हे हे उत्तरेकडून धावून आले. प्रचारसभांमध्ये जोरदार भाषण करत त्यांनी लंकेंना पाठबळ दिले. यामुळे जिल्ह्यात अनेक निवडणुकांमध्ये विखे यांच्या विरुद्ध कोल्हे हा संघर्ष पाहायला मिळाला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube