Download App

शेळ्या चोरीच्या संशयातून बेदम मारहाण करत एकाचा जीव घेतला; सरपंचासह तीस जणांविरुद्ध गुन्हा

नगर तालुक्यातील पांगरमल येथे शेळी चोरीच्या संशयातून चौघांना मारहाण झाली. त्यात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

  • Written By: Last Updated:
Image Credit: letsupp

अहमदनगरः शेळ्या चोरीच्या संशयातून ग्रामस्थांनी तिघांना बेदम मारहाण केली. त्यात एकाचा मृत्यू झाला आहे. नगर शहरापासून वीस किलोमीटर असलेल्या पांगरमल (ता. नगर) या गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आता एमआयडीसी पोलिस स्टेशनला सरपंचासह तीस जणांविरुद्ध खून करणे, अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (अॅट्रासिटी) गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपी हे फरार झाले असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
मारहाणीत चांगदेव नामदेव चव्हाण यांचा मृत्यू झाला आहे. तो मुळचा संभाजीनगर जिल्ह्यातील पखोरा (ता. गंगापूर) येथील रहिवासी आहे. तो नातेवाइकांसह पांगरमल गावात काही दिवसांपासून राहत होता. (One was beaten to death on suspicion of goat theft; Crime against 30 people including Sarpanch ahmednagar)

मनपा आयुक्त पंकज जावळेंचा जामीन लांबणीवर; पुढील सुनावणी 8 जुलैला!

चांगदेव चव्हाण, त्याची भावजई, फिर्याद देणारी महिला, एक मुलगा हे तिघे बुधवारी रात्री घरी होते. त्याचवेळी गावातील लोक कुऱ्हाडी, कोयते व लाकडी दांडके घेऊन घरी आले. तुम्ही गावात शेळ्या चोरतात, असा ग्रामस्थांना संशय घेतला. त्यानंतर चौघांना लाकडी दांडक्याने व लाथाबुक्याने मारहाण केली. त्यात फिर्यादी, तिचा मुलगा, चोरीच्या संशयावरून पकडलेले चांगदेव चव्हाण यांना मारहाण केली. त्यानंतर या तिघांना ग्रामपंचायत कार्यालयासमोर घेऊन गेले. तेथे मारहाण केली. त्यात चांगदेव चव्हाण हा गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात महादेव आव्हाड, सरपंच अमोल आव्हाड, उद्धव महादेव आव्हाड, आजिनाथ महादेव आव्हाड, गणेश अंबादास आव्हाड, संदीप पंढरीनाथ आव्हाड व इतर वीस ते पंचवीस जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे

मोठी बातमी! मनसे कामगार सेनेच्या जिल्हाध्यक्षावर दिवसाढवळ्या गोळीबार, चंद्रपुरात एकच खळबळ

दरम्यान पांगरमल हे गाव सहा वर्षांपूर्वी चर्चेत आले होते. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत विषारी दारू वाटल्यामुळे गावातील बाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. आता पुन्हा हे हत्येमुळे चर्चेत आले आहे.


आरोपी गावातून पसार

घटनेची माहिती व तास घटनास्थळी पोलिसांनी तातडीने दाखल होत तपास सुरू केला. मात्र या मारहाणीमध्ये गावकऱ्यांचा देखील समावेश असल्याने कारवाईच्या भीतीने अनेक जण गावातून पसार झाले झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या आरोपींचा शोध सुरू आहे.


जनावरे चोरीबाबत पोलिसांना निवेदन

नगर तालुक्यातील अनेक गावात सध्या पशुधन चोरी जात आहे. पांगरमलमध्ये अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी चोऱ्यांबाबत एमआयडीसी पोलिस स्टेशनला निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर ही घटना घडली आहे.

follow us

वेब स्टोरीज