Download App

शिवाजीराव कर्डिलेंची ताकद वाढली! राजू शेटे पाटलांचा शिंदे गटात प्रवेश अन् पाठिंबाही…

धर्मवीर छत्रपती संभाजीराजे युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू शेटे पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांना पाठिंबाही जाहीर केलायं.

Rahuri Assembly Constituency : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून अनेक कार्यकर्ते विविध पक्षांत प्रवेश करीत आहेत. अशातच धर्मवीर छत्रपती संभाजीराजे युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू शेटे पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शेटे पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश करताच राहुरी विधानसभा मतदारसंघातील (Rahuri Assembly Constituency) महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

मीच जिंकणार, कोणताही वाद नाही, अर्ज दाखल करताच बापूसाहेब पठारेंना फुल कॉन्फिडन्स…

सध्या राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर राजू शेटे पाटील यांचा प्रवेश सोहळा पार पडणार असल्याची माहिती समोर आलीयं. शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर राजू शेटे पाटील यांना महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांना पाठिंबा जाहीर केला असून कर्डिले यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असं आवाहनही केलं आहे.

खासगी वाहनावर लाल-निळा दिवा; तोतया आयपीएस अधिकारी बनून व्यावसायकाला घाता 1 कोटीचा गंडा

मागील निवडणुकीत शिवाजीराव कर्डिले यांचा राष्ट्रवादीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी पराभव केला होता. या निवडणुकीत कर्डिले यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी मतदारसंघात आपली पकड कायम ठेवली. जनता दरबाराच्या माध्यमातून कर्डिले यांनी जनेतेचे अनेक प्रश्न सोडवले. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ते कर्डिले यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेऊन भाजपसह शिंदे गटात प्रवेश करीत आहेत.

‘भोर’मध्ये महाविकास आघाडीला मोठा फटका; शंकर मांडेकर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार

शिवाजीराव कर्डिले यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महायुतीमध्ये शेकडो कार्यकर्ते प्रवेश करीत आहेत. भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीत शिवाजी कर्डिले यांना उमेदवारी घोषित करण्यात आली. त्यानंतर राहुरीसह, जेऊरसह अनेक गावांतील कार्यकर्त्यांकडून भाजपात प्रवेश केला जात असल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, कर्डिले गटामध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू असून भाजपने 2019 नंतर पुन्हा शिवाजी कर्डिले यांना तिकीट दिलंय. विरोधामध्ये शरद पवार गटाकडून प्राजक्त तनपुरे निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यामुळं राहुरीत पुन्हा कर्डिले आणि तनपुरे यांच्यातच अटीतटीचा सामना होणार आहे. यंदाच्या निवडणुकीमध्ये 2019 च्या पराभवाचा वचपा कर्डिले काढणार का? हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे

follow us