Download App

नागवडेंच्या हातात ‘घड्याळ’; पाचपुतेंचे विधानसभेचे तिकीट हुकणार?

  • Written By: Last Updated:

Ahmednagar Politics : प्रवीण सुरवसे, प्रतिनिधी : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीपूर्वीच (Assembly Election) अहमदनगर जिल्ह्यात राजकीय उलथापालथी सुरू झाल्यात. अनुराधा नागवडे (Anuradha Nagawade) व राजेंद्र नागवडे यांनी काँग्रेसला राम-राम ठोकत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केलाय. विधानसभेचे वेध लागलेल्या नागवडे यांच्या या पक्षप्रवेशामुळे भाजप (BJP) आमदार बबनराव पाचपुते (Babanrao Pachpute) यांची कोंडी झालीय. नागवडे दाम्पत्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशामुळे श्रीगोंदा मतदारसंघाचे राजकीय गणित कसे बदलत आहे हे पाहूया…


एकनाथ शिंदे, अजित पवार हे भाजपचे कॉन्ट्रॅक्ट लेबर; संजय राऊतांची घणाघाती टीका

गेल्या निवडणुकीत काँग्रेसकडून उमेदवारीसाठी राजेंद्र नागवडे प्रयत्नशील होते. पण एेनवेळी श्रीगोंद्यातील राजकारण बदलेले. नागवडे हे भाजपमध्ये गेले होते. त्यानंतर काँग्रेसमध्ये आले. काँग्रेसमध्ये भवितव्य नसल्याने आता ते थेट अजितदादांच्या राष्ट्रवादीत आले. राजकारणात कधी शांत राहणे, अनेकदा पक्ष बदलणाऱ्या नागवडे दाम्पत्याने कोणताही परिस्थितीमध्ये 2024 ची विधानसभा निवडणूक लढवणारच असा निर्धार केलाय. अजित पवारांच्या पाठिंबा आपल्याला असल्याचे जाहीर करत त्यांनी विधानसभेचे रणशिंग फुंकले आहे.

Akola News : कामगारांचा रोष! पालकमंत्री विखे उद्घाटन न करताच माघारी फिरले

नागवडेंच्या जमेच्या बाजू कोणत्या ?

नागवडे यांनी गेली अनेक वर्षे श्रीगोंद्यात काँग्रेससाठी पक्ष संघटन केले आहे. सहकारामुळे नागवडेंना मानणारा वर्ग आहे. राजेंद्र नागवडे यांच्या ताब्यात सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी कारखाना आहे. तसेच अनुराधा नागवडे यांनीही महिलांमध्ये संपर्क ठेवलेला आहे. त्याचा फायदा नागवडे यांना होऊ शकतो.

‘पाचपुते’ सात टर्मचे आमदार, भाजप जागा सोडणार का ?

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ सध्या भाजपच्या ताब्यात आहे. बबनराव पाचपुते हे येथील आमदार आहेत. 2014 पर्यंत श्रीगोंदा मतदारसंघ बबनराव पाचपुते यांचा बालेकिल्ला होता. 1980, 1985, 1990, 1995, 2004, 2009 आणि 2019 च्या निवडणुकांमध्ये जनता पक्ष, जनता दल, काँग्रेस, अपक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप या पक्षाकडून पाचपुते हे निवडून आलेत. तब्बल सात टर्म आमदार राहिलेले पाचपुते 2024 च्या विधानसभेसाठी देखील पुन्हा तयारी करतायत. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव ते माघार घेऊ शकतात. तरी मात्र ते आपल्या चिरंजीवांसाठी आग्रही आहे असे समजते. परंतु त्यांचे पुतणे साजन पाचपुते हे विरोधात गेलेले आहे. त्यांनी काकांना ग्रामपंचायत निवडणुकीत झटका दिलेला आहे. त्यामुळे बबनराव पाचपुते राजकीय बॅकफूटवर आलेले आहे. त्याचा फायदा दुसरे पक्ष उठवू शकतात. महायुतीमध्ये भाजपही ही जागा सहजासहजी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोडणार का हा प्रश्न आहे.

श्रीगोंद्यातील राजकीय गणिते काय ?

श्रीगोंद्यामध्ये राष्ट्रवादी व भाजपात थेट लढत ही आजवर होत आली आहे. मात्र मध्यंतरीच्या काळात राजकीय पक्षांमध्ये झालेल्या फुटीमुळे या मतदारसंघाचे गणित देखील फिस्कटली आहे. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून माजी आमदार राहुल जगताप हे उमेदवारीच्या तयारीत आहेत. तर राष्ट्रवादीकडून अनुराधा नागवडे तयारी करतायत. या मतदार संघात बीआरएसकडून घनश्याम शेलार हे देखील विधानसभा लढविण्याची तयारी करत होते. पण बीआरएसला स्वतःचे राज्य राखता आलेले नाही. त्यामुळे शेलारांची भविष्यातील भूमिका अद्याप स्पष्ट नाही. पाचपुते, जगताप, नागवडे, शेलार असे प्रबळ उमेदवार या मतदारसंघातून इच्छुक आहे.

कर्डिलेंचा शब्दही महत्त्वाचा…

नगर तालुक्यातील चिंचोडी पाटील आणि वाळकी जिल्हा परिषद गटातील गावे ही श्रीगोंदा मतदारसंघाला जोडलेले आहेत. या भागात जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांचेही वर्चस्व आहे. त्यामुळे नगर तालुक्यातील मतांचे गणित बघता, श्रीगोंद्यात कोण उमेदवार द्यायचे यासाठी कर्डिलेंचा शब्दही पक्षात महत्त्वाचा असतो. या मतदारसंघातून अद्याप उमेदवारीसाठी कोणाच्याही नावाची घोषणा झाली नसली तरी यंदाची श्रीगोंदा विधानसभा निवडणूक जोरदार होणार हे मात्र नक्की.

follow us