Akola News : कामगारांचा रोष! पालकमंत्री विखे उद्घाटन न करताच माघारी फिरले

  • Written By: Last Updated:
Akola News : कामगारांचा रोष! पालकमंत्री विखे उद्घाटन न करताच माघारी फिरले

Akola News : अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) हे अकोला दौऱ्यावर असतांना विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावत काल रात्री जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील ‘बोलक्या रस्त्याचे’ चे विखे उद्घाटन करणार होते. मात्र, ऐनवेळी पालकमंत्र्यांना उद्घाटन न करताच माघारी फिरण्याची वेळ आली. त्यामुळं उलट-सुलट चर्चांना उधान आलं आहे.

सुनेत्रा पवारांच्या बॅनरवर शाईफेक; पोलिसांनी बॅनर हटवला! 

सविस्तर वृत्त असेल की, बिर्ला कॉलनीतील कामगार आपल्या कुटुंबीयांसह अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या काही दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. प्रशासनाने या मजुरांच्या ७० कुटुंबांना घरे खाली करण्याची नोटीस दिल्यानंतर हे उपोषण सुरू झालं. अकोला ऑईल इंडस्ट्रीज आणि बिर्ला ऑईल मिल्स हे तीस वर्षांपूर्वी बंद पडले आहे. परंतु, 70 कामगाराची देणी थकल्याने या कामगारांचे कुटुंबीय मिलच्य जागेतच राहताहेत. त्यामुळं त्यांच्याकडून उपोषण सुरू आहे.

पराभूत उमेदवारांची न्यायालयात धाव; हेराफेरी झाल्याचा आरोप करत याचिका दाखल 

शनिवारी रात्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील ‘बोलके रस्ते’ या सुशोभीकरण प्रकल्पाचे उद्घाटन होणार होते. यासाठी विखे पाटील यांची वेळ घेऊन संपूर्ण तयारी देखील करण्यात आली होती. मात्र, या कार्यालयाच्या आवारात उपोषणाला बसलेल्या कामगारांनी पालकमंत्र्यांची भेट घेण्याची मागणी केली. मात्र, पालकमंत्री भेटताच निघून गेल्यांनं कामगारांनी पालकमंत्री आणि सरकारविरोधात मोठा रोष व्यक्त केला. आंदोलनकर्त्यांचा रोष टाळण्यासाठी पालकमंत्री परत निघून गेल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. यावेळी बोलताना कामगारांच्या भावना अनावर झाल्या होत्यातर पालकमंत्र्याची प्रकृती चांगली नसल्याने ते लोकार्पण न करताच गेल्यचाा दावा भाजपने केला. तर यावर विखे पाटील यांची प्रतिक्रिया मात्र, मिळू शकली नाही.

दरम्यान, अकोला जिल्ह्यातील अकोट येथे प्रांत व तहसील कार्यालयाचे उद्घाटन विखे पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना विखे म्हणाले, राज्यभरात जमीन अभिलेख आणि मालमत्ता नोंदणी आणि खरेदी-विक्रीसाठीची उपनिबंधक कार्यालये आता तहसील आणि प्रांत कार्यालय परिसरात असतील. या कार्यालयांच्या बाहेर अनेक ठिकाणी गैरप्रकार होत असल्याची कबुलीही विखे यांनी दिली. त्यामुळे गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज