सुनेत्रा पवारांच्या बॅनरवर शाईफेक; पोलिसांनी बॅनर हटवला!

सुनेत्रा पवारांच्या बॅनरवर शाईफेक; पोलिसांनी बॅनर हटवला!

Sunetra Pawar Banner News : आगामी निवडणुका काही दिवसांवरच येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे आता राज्याचं राजकारण चांगलच तापू लागलं आहे. अशातच बारामतीत एक घटना घडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या फलकावर शाईफेकण्याची घटना घडल्याचं समोर आलं आहे. काऱ्हाटी गावच्या वेशीवर भावी खासदार सुनेत्रा पवार यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असा मजकूराचे बॅनर लावण्यात आले होते. या फलकावर अज्ञातांकडून शाईफेक करण्यात आली आहे.

भाजप आमदाराच्या गोळीबार प्रकरणाचे अहमदनगर कनेक्शन : फरार रणजीत यादवला अटक

मागील काही दिवसांपासून बारामीत लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे. या मतदारसंघात सुप्रिया सुळे विद्यमान खासदार आहेत. राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर आता बारामती लोकसभा निवडणूकीत सुनेत्रा पवार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उतरणार असल्याचं बोललं जात होतं. बारामती मतदारसंघातील कार्यकर्त्यांकडूनही सुनेत्रा पवार यांनाच उमेदवारी देण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे. अशातच ही शाईफेकीची घटना घडल्याने एकच चर्चा सुरु झाली आहे.

“त्यांनी आमचे ऐकले नाही, म्हणून…” : निखिल वागळे यांना प्रत्युत्तर देत पुणे पोलिसांचे पाच गंभीर प्रतिआरोप

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते वीरधवल जगदाळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. या मागणीनंतर बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद आणि भावजय अशी लढत होणार का? अशा चर्चांना ऊत आला होता. वीरधवल जगदाळे अजित पवार यांच्या जवळचे मानले जातात. त्यांनीच सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळण्याच्या मागणीचं पत्र सुनिल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे दिलं आहे.

Road Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! कंटेनर-कारच्या धडकेत तिघे जागीच ठार

दरम्यान, राष्ट्रवादीतील बंडानंतर पुणे जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी हे अजित पवारांसोबत गेल्याने शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे. अजित पवारांसोबत जाण्यामागे अनेक कारणे आहेत. दोन दशकांपासून राज्याचा कारभार शरद पवारांनी अजित पवारांच्या हातात सोपवला आणि ते केंद्रात रमले. त्यामुळे अजित पवारांच्या बंडानंतर अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अजित पवारांसोबत असण्याचे पाहायला मिळतात.

दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या बॅनरवर शाईफेक केल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे. यावेळी पोलिसांन पाहणी करुन बॅनर काढला आहे. या घटनेनंतर पोलिसांकडून अज्ञात इसमांचा शोध घेण्याचं काम सुरु आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज