Prajakt Tanpure : अनेक ठिकाणी लोक सांगत आहेत आम्हाला पैसे देऊन सभेसाठी बोलावण्यात आलं. मात्र, अत्यंत की लोकांमध्ये विरोधकांना सभा घ्यावी लागत आहे. परंतु, आमच्या सभेसाठी आलेला प्रत्येक व्यक्ती स्वागभिमानी आहे. (Prajakt Tanpure) तो कुणाच्या पैशाने आलेला नाही असं म्हणत प्राजक्त तनपुरे (Sharad Pawar) यांनी विरोधकांवर जोरदार हमला केला. (Nilesh Lanke) ते आयोजीत प्रचार सभेत बोलत होते.
भाषा महत्वाची नाही
हे भकास सरकार आले आणि शेतकऱ्यांचे हाल सुरू झाले. आमच्या अडीच वर्षांच्या काळात प्रत्येक शेतकऱ्याला डीपी पोहच झाली. त्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेळेवर वीज मिळाली. मात्र, या सरकारने शतकऱ्यांन काही दिलं तर नाही. परंतु, जे दिलं आहे त्याचीही व्यवस्थित अंमलबजावनी केली नाही अशीही टीका तनपुरे यांनी केली आहे. तसंच, आपला उमेदवार आपले प्रश्न कोणत्या भावनेने मांडतो हे महत्वाचं आहे कोणत्या भाषेत मांडतायेत हे महत्वाचं नाही असा टोलाही तनपुरे यांनी विरोधकांना लगावला आहे.
आज शेवटचा दिवस, इच्छुकांची होणार पळापळ; नगरसाठी लंकेंनंतर तनपुरेंचाही अर्ज
राहुरी तालुका हा कुणाची जहागिरी नाही
विरोधी उमेदवारांनी राहुरी मतदार संघाला गृहीत धरलं आहे. आपलं हे होम ग्रांऊंड आहे. इथ आपल्यालाच मत मिळणार असा त्यांचा विश्वास आहे. परंतु, ४ जून रोजी आपल्याला कळेल राहुरी मतदारसंघ काय चिज आहे असं म्हणत मला राहुमधून विधानसभेला जे मताधिक्य मिळाल त्यापेक्षा दुप्पट लंके यांना मिळवून देणार असा विश्वासही तनपुरे यांनी व्यक्त केला. तसंच, ज्या विश्वासाने राहुरी तालुक्याने संधी दिली तेथिल लोकांचा भ्रमनिराश केला. तसंच, काही दिलं तर नाहीच. परंतु, या तालुक्याचे लचके तोडण्याचं काम तुम्ही केलं असा घणाघातही तनपुरे यांनी यावेळी केला. तसंच, राहुरी तालुका हा कुणाची जहागिरी नाही असा थेट प्रहारही तनपुरे यांनी यावेळी केला आहे.
निलेश लंके लोकसभेची ‘तुतारी’ फुंकणार का? तनपुरेंचं सूचक विधान
तुमच्या शिक्षणचा उपयोग काय
आमच्यावरही मोठा दबाव आहे. परंतु, 84 वर्षाचा तरुण लढत असेल तर आपण काय आहोत असं आम्हाला वाटतं म्हणून आम्ही लढत आहेत. कारण आम्हालाही खूप नोटीस येत राहतात. परंतु, त्याला आम्ही दाद देत नाहीत. असंही तनपुरे यावेळी म्हणाले आहेत. नगरच्या लोकांनी आपल्या शहरातील गुंडगिरी संपेल या हेतुने विरोधकांना निवडून दिलं मात्र, तुम्ही ज्यांच्याविरोधात लढायचं होत त्यांच्याच बाजुने तुम्ही उभे राहिला असाल तर काय तुमच्या मोठेपणाचा आणि शिक्षणचा उपयोग आहे अशा शब्दांत तनपुरे यांनी नाव न घेता विरोधकांवर टीका केली.