आज शेवटचा दिवस, इच्छुकांची होणार पळापळ; नगरसाठी लंकेंनंतर तनपुरेंचाही अर्ज

आज शेवटचा दिवस, इच्छुकांची होणार पळापळ; नगरसाठी लंकेंनंतर तनपुरेंचाही अर्ज

Ahmednagar Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून आता राजकीय हालचालींना वेग प्राप्त झाला आहे. यातच आज नगर व शिर्डी या लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. इच्छुक उमेदवारांची धावपळ होणार असल्याचे देखील दिसते. नगर दक्षिणेत महाविकास आघाडीने नीलेश लंके यांना तिकीट दिलं. यानंतर त्यांनी कोणताही गाजावाजा न करता अर्जही दाखल केला. परंतु, यामध्ये आता मोठा ट्विस्ट आला आहे. काल बुधवारी अचानक राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनीही अर्ज दाखल केला. आता तनपुरे यांनी अर्ज दाखल केल्याने शरद पवारांचं हे धक्कातंत्र तर नाही ना अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला व त्यानंतर उमेदवारांची नावे देखील जाहीर झाली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर 18 एप्रिल ते 25 एप्रिलदरम्यान उमेदवारांना आपापले अर्ज दाखल करायचे आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून आज या अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. 26 एप्रिल शुक्रवारी अर्जाची छाननी करण्यात येणार असून उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख ही 29 एप्रिल असून व नगर दक्षिण लोकसभेसाठी 13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

Baramati Lok Sabha : रोहित अन् पार्थ पवार एकाच वाहनात; बारामतीच्या हायहोल्टेज लढतीत नवं पॉलिटिक्स

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी सात उमेदवारांनी 11 अर्ज दाखल केले आहेत तर दुसरीकडे शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी 9 उमेदवारांनी अद्याप अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने अहमदनगरसाठी सात व्यक्तींनी 14 अर्ज घेतलेले आहेत.

दक्षिणेत दुरंगी लढत

दक्षिणेमध्ये महाविकास आघाडीकडून नीलेश लंके यांना उमेदवारी जाहीर झाली आहे तर महायुतीकडून सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. दक्षिणेत विखे विरुद्ध लंके असा सामना लोकसभेत पाहायला मिळणार आहे. राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणारी ही लढत असून दोन्ही उमेदवारांकडून जोरदार प्रचारदेखील सुरू झाला आहे. आपापल्या उमेदवारांच्या विजयासाठी आता मोठमोठे नेतेमंडळी देखील नगरकडे येत आहेत.

शिर्डीमध्ये तिरंगी लढत

आरक्षित असलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून भाऊसाहेब वाकचौरे महायुतीकडून सदाशिव लोखंडे यांच्यात लढत होणार होती. मात्र यामध्ये आता वंचितकडून उत्कर्षा रूपवते यांनी देखील लोकसभेच्या रिंगणात उडी घेतली आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघांमध्ये तिरंगी लढत होणार असून तिन्ही उमेदवारांनी आपापले अर्ज दाखल केले आहेत.

Loksabha Election: लोकसभा निवडणूकीबद्दल अभिनेत्याने दिली महत्वाची माहिती, म्हणाला…

follow us
  • fb
  • instagram
  • youtube