Lok Sabha Election साठी लंकेंकडून शक्तिप्रदर्शन न करता साध्या पद्धतीने अर्ज दाखल

Lok Sabha Election साठी लंकेंकडून शक्तिप्रदर्शन न करता साध्या पद्धतीने अर्ज दाखल

Lok Sabha Election Nilesh Lanke Application filed without show of strength : अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील ( Lok Sabha Election ) महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके ( Nilesh Lanke) आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे लंके यांचा हा अर्ज दाखल करताना कोणतेही शक्तिप्रदर्शन ( show of strength ) करण्यात आले नाही.

काँग्रेसच्या समर्थनार्थ ‘पुष्पा’ फेम अभिनेता उतरला रस्त्यावर? Viral Video मागील सत्य काय?

हा अर्ज दाखल करण्यापूर्वी लंके यांच्या हंगा गावातील निवासस्थानी लंके यांचे आई, पत्नी तसेच स्थानिक महिलांनी औक्षण केले. यानंतर लंके यांनी ग्रामदैवताचे दर्शन घेतले. यावेळी व लंके यांच्यावर फुलांची उधळण स्थानिक ग्रामस्थ तसेच समर्थकांनी केली. त्यानंतर लंके यांनी अगदी साधेपणाने उमेदवारी अर्ज दाखल केला.

शूटिंग असो वा प्रवास ‘वाचत राहिलं पाहिजे’ World Book Day निमित्त कलाकरांचा संदेश

दरम्यान काल ( 22 एप्रिलला ) खासदार सुजय विखे यांनी महायुतीकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना मोठी शक्ती प्रदर्शन केले होते. त्यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री महसूल मंत्री राधाकृष्ण विखे, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, प्रवीण दरेकर आदी दिग्गज मंडळी उपस्थित होती.

पार्थ पवार यांना थेट ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा! मात्र, सुरक्षा देण्याचं कारण काय?

मात्र निलेश लंके यांनी कोणताही ताणझाम न करता किंवा भव्य दिव्य रॅली न काढता त्याच बरोबर कोणताही महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांना न बोलवता अगदी सामान्यपणे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांचे निकटचे सहकारी उपस्थित होते. तसेच यावेळी त्यांच्यासोबत काही दिव्यांग बांधव देखील या अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित होते.

यावर बोलताना लंके म्हणाले की, हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर मी नगर दक्षिणसाठी अर्ज दाखल केला आहे. तसेच महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे नेते यावेळी उपस्थित होते. मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आपण हा अर्ज दाखल करत आहोत. तसेच मला आज गदा मिळाल्या कारण मी एक हनुमान भक्त आहे. अशी प्रतिक्रिया हा अर्ज दाखल करताना लंके यांनी दिली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube