Download App

“बारामतीत अपक्ष लढलो असतो तर एक हजार टक्के जिंकलो असतो”; शिवतारेंचा अजितदादांवर निशाणा

बारामतीची जागा मी लढलो असतो तर एक हजार टक्के निवडून आलो असतो असे म्हणत विजय शिवतारे यांनी पुन्हा अजितदादांना डिवचले आहे.

Baramati Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. निवडणूक जिंकण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी पूर्ण ताकद पणाला लावली होती. मात्र सुप्रिया सुळेंचा पराभव शक्य झाला नाही. निवडणुकीआधीही या मतदारसंघात अनेक घडामोडी घडल्या. माजी आमदार विजय शिवतारे यांनी अजितदादांविरोधात उघड उघड बंड पुकारले होते. महायुतीच्या नेत्यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला होता. शिवतारे यांनीही निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत सुनेत्रा पवार यांचा प्रचारही केला होता. परंतु, हा वाद अजूनही थांबला नसल्याचे पुन्हा दिसले आहे. बारामतीची जागा मी अपक्ष म्हणून लढलो असतो तर एक हजार टक्के निवडून आलो असतो असे म्हणत विजय शिवतारे यांनी पुन्हा अजितदादांना डिवचले आहे.

Baramati Lok Sabha : रोहित अन् पार्थ पवार एकाच वाहनात; बारामतीच्या हायहोल्टेज लढतीत नवं पॉलिटिक्स

बारामतीत महायुतीचा विजय व्हावा अशी सर्वांचीच इच्छा होती. मी ही जागा अपक्ष म्हणून लढलो असतो तर एक हजार टक्के जिंकलो असतो. याचं कारण म्हणजे दोन्ही उमेदवारांना मोठा विरोध होता. या मतदारसंघात पक्ष नाहीत तर दोन प्रवाह आहेत. या मतदारसंघात जवळपास 5 लाख 80 हजार इतकं पवार विरोधी मतदान आहे. त्यांना दोन्ही उमेदवारांना मतदान करायचं नव्हतं. त्यांना मतदानाची संधी मिळावी म्हणून लोकशाहीतील पवित्र काम मी करतोय असं मी म्हणालो होतो. त्यावेळी मी कुणाच्याही विरोधात नव्हतो, असे शिवतारे म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत विजय शिवतारे यांनी अपक्ष लढण्याची तयारी केली होती. त्यामुळे बारामती मतदारसंघात मोठा ट्विस्ट निर्माण झाला होता. विजय शिवतारे यांनी पत्रकार परिषदा घेत अजित पवारांवरही जोरदार टीका केली होती. परंतु, नंतर महायुतीच्या नेत्यांनी मध्यस्थी केल्याने हा वाद मिटली होता. शिवतारे यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली होती.

विजय शिवतारे यांचे बंड शमले : अजितदादा यांच्या शेजारी उभे राहून खळखळून हसले

काय होता वाद?

“बारामती लोकसभा मतदारसंघ कोणाचा सातबारा नाही. आता बदला घेण्याची वेळ आलीय… अजितदादांची गुर्मी जाणार नाही… आता माघार घेणार नाही… अशी एकापेक्षा एक आक्रमक विधान करत विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवार यांच्याविरोधात शड्डू ठोकला होता. शिवतारेंच्या अपक्ष उमेदवारीच्या घोषणेमुळे येथे तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यामुळे अजित पवार यांचे टेन्शन वाढले होते.

follow us