Download App

Railway Budget 2024 : अहमदनगर-परळी मार्गासाठी 275 कोटींची तरतूद, आणखी नवे ट्रॅक कुठे?

  • Written By: Last Updated:
Image Credit: letsupp

Railway Budget : अर्थमंत्री निर्मला सितारामण (Nirmala Sitaraman) यांनी यांनी अंतरिम अर्थसंकल्प (Interim Budget) संसदेत सादर केला आहे. रेल्वेसाठी 2 लाख 40 हजार कोटींची भांडवली तरतूद करण्यात आली आहे. तसेच नवे कॉरिडॉरही उभारण्यात येणार आहेत. अंतरिम रेल्वे बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी 15 हजार 554 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीपेक्षा महाराष्ट्रात रेल्वेसाठी अडीच हजार कोटी रुपयांची जास्त तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षी तेरा हजार कोटी रुपयांची तरतूद होती. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे.

Loksabha Election : महाविकास आघाडीकडून लढणार का ? संभाजीराजेंचे थेट उत्तर

राज्यात सहा नव्या रेल्वे मार्गिकाही (नव्या ट्रॅकसाठी) निर्माण करण्यासाठी मोठा निधी मिळणार आहे. यासाठी 1 हजार 940 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहेत. काही भागात दुसरी, तिसरी आणि चौथी मार्गिका उभारण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. यासाठी 1 हजार 610 कोटी रुपये निधी मिळणार आहे. तर कसारा, कर्जत, पुणे येथील रेल्वे यार्डाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे.

ब्राह्मण समाजासाठी मोठा निर्णय! परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन होणार, मंत्रीमंडळात येणार प्रस्ताव

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या व काही भागात काम झालेल्या नगर-बीड-परळी रेल्वेमार्गसाठी नवी तरतूद करण्यात आली आहे. या मार्गासाठी पावणे तिनशे कोटी रुपये मिळणार आहे. तर बारामती-लोणंद रेल्वेमार्गासाठी 330 कोटी, वर्धा-नांदेड रेल्वे मार्गासाठी सर्वाधिक 750 कोटी रुपये निधी मिळणार आहे. सोलापूर-उस्मानाबाद (तुळजापूर रेल्वे मार्ग) या मार्गासाठी 225 कोटी रुपये, तर धुळे-नार्धना रेल्वे मार्गासाठी 350 कोटी, कल्याण-मुरबाड बारस्ता उल्हासनगर रेल्वे मार्गासाठी दहा कोटींची निधी मिळणार आहे.

दौंड-मनमाड दुसऱ्या मार्गिकेसाठी तिनशे कोटी; जळगावसाठी भरघोस निधी

कल्याण-कसारा दरम्यान तिसरी मार्गिका उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी 85 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
वर्धा -नागपूर रेल्वे तिसरी मार्गिकेसाठी 125 कोटी, वर्धा-बल्लारशाहा तिसरी मार्गिकेसाठी 200 कोटी, इटारसी नागपूर तिसरी मार्गिका – 320 कोटी, पुणे मिरज रेल्वे दुसरी मार्गिकेसाठी 200 कोटी रुपये निधी मिळणार आहे. तर दौंड मनमाड दुसरी मार्गिकेसाठी 300 कोटी, वर्धा नागपूर दरम्यान चौथी मार्गिकेसाठी 120 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर मनमाड जळगाव तिसऱ्या मार्गिकेसाठी 120 कोटी रुपये, जळगाव-भुसावळ दरम्यान चौथी मार्गिका उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 40 कोटींची तरतूद आहे. तर भुसावळ-वर्धात तिसऱ्या मार्गिकेसाठी शंभर कोटी रुपये तरतूद आहे. तर पाचोरा-जामनेर मार्गाचे गेजमध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. त्यासाठी तिनशे कोटी रुपये निधी मिळणार आहे.

follow us

वेब स्टोरीज