‘हे सरकार केवळ ज्ञान देतंय’; अर्थसंकल्पावरून प्रकाश आंबेडकरांचे सरकारवर टीकास्त्र

  • Written By: Published:
‘हे सरकार केवळ ज्ञान देतंय’; अर्थसंकल्पावरून प्रकाश आंबेडकरांचे सरकारवर टीकास्त्र

Prakash Ambedkar on Budget 2024 : देशात काही महिन्यात सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्याआधीच भारत सरकारचा अंतरितम अर्थसंकल्प सादर झाला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी आज संसदेत देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून सरकार केवळ ज्ञान देत असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडक (Prakash Ambedkar) यांनी केली आहे. आंबेडकरांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत केंद्र सरकारवर निशाणा साधला.

Loksabha Election : महाविकास आघाडीकडून लढणार का ? संभाजीराजेंचे थेट उत्तर 

आजच्या अर्थसंकल्पात कररचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र, घोषणांचा पाऊस पाडण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात घरे बांधण्यापासून मोफत वीज देण्यापर्यंत सर्वच गोष्टींची घोषणा करण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंनी या अर्थसंकल्पावर टीका करतांना मोदी सरकारने टोपी घातली अशी टीका केली. तर प्रकाश आंबेडकरांनीही सरकारवर हल्लाबोल केला. त्यांनी लिहिलं की, हे सरकार केवळ ज्ञान पाजाळतंय, पण देशातील तरुण, गरीब, महिला आणि शेतकऱ्यांचा त्यांनी विश्वासघात केला आहे. अर्थमंत्री केवळ स्वत:ची थोपटून घेण्यात आणि खोटं बोलण्यात धन्यता मानत आहेत, अशी टीका केली.

‘दक्षिण भारत वेगळा देश जाहीर करा’; अर्थसंकल्पानंतर काँग्रेस खासदाराची अजब मागणी 

त्यांनी पुढं अर्थमंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे जर आपली अर्थव्यवस्था चांगली असेल, तर गेल्या नऊ वर्षांत तब्बल १२,८८,२९३ अतिश्रीमंत व्यक्ती आणि उद्योजक देश का सोडून गेले? व्हायब्रंट गुजरातमधील 7,25,000 नागरिकांनी अमेरिकेत बेकायदेशीरपणे प्रवेश करण्याचा प्रयत्न का केला? असा सवाल त्यांनी या पोस्टमधून विचारला आहे. तसेच, लोकांच्या सरासरी उत्पन्नात 50 टक्क्यांनी वाढ झाल्याचा सरकारचा दावा करतय, पण, या या माहितीचा स्रोत काय? असा सवालही आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.

या पोस्टमध्ये त्यांनी प्रधानमंत्री किसान योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या आणि दिलेली माहिती संशयास्पद असल्याची शंकाही व्यक्त केली आहे.

हा अंतरिम नसून अंतिम अर्थसंकल्प असल्याचं राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. आज केंद्र सरकारने देशातील शेतकरी, बेरोजगार, सामान्य जनता, कष्टकरी, मध्यमवर्गीयांची फसवणूक करणारा अर्थहीन अर्थसंकल्प सादर करून करदात्यांना लुटण्याची परंपरा सुरू ठेवल्याची टीका केली.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube