Download App

जयंत पाटलांनंतर प्रदेशाध्यपदासाठी दोन नेत्यांची चर्चा; पद कुणालाही मिळालं तरी, गणित फायद्याचचं

  • Written By: Last Updated:

Who Will Be The New Precident Of Sharad Pawar NCP : शरद पवारांच्या(Sharad Pawar) राष्ट्रवादीचा 26 वा वर्धापन दिन काल (दि.10) पुण्यातील बालगंधर्व रंग मंदीरात पार पडला. यावेळी विविध नेत्यांनी भाषणं ठोकली. पण चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलं ते विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांचं भाषणं. एकीकडे जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याचे संकेत दिलेले असताना आता दुसरीकडे या पदासाठी पवारांच्याच पक्षातील दोन निष्ठावंत शिलेदारांची नावे चर्चेत आली आहेत. हे दोन नेते कोण त्यांचा पक्षातील दबदबा नेमका कसा याबद्दल जाणून घेऊया.

“जयंत पाटील राजकारणातून संपलेला विषय, दिवा विझताना जसा..”, पडळकरांची जहरी टीका

कार्यकर्त्यांच्या घोषणांनंतर राजीनामास्त्र म्यान

‘राष्ट्रवादी’तील तरुण नेतृत्वाला संधी मिळावी, यासाठी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांचा आग्रह आहे. पवार आणि पाटील यांच्यातील सुप्त संघर्ष ‘राष्ट्रवादी’त सर्वश्रुत आहे. पाटील यांनी मेळाव्यात पदापासून बाजूला होत असल्याचा सूर लावला, तेव्हा कार्यकत्यांकडून ‘नाही नाहीं’च्या घोषणा देण्यात आल्या. कार्यकत्यांच्या विरोधामुळे पाटील यांना त्यांचे राजीनामास्त्र तुर्तास म्यान करावे लागले; तरी पक्षातील एक गट त्यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही आहे.

पवारांचे निष्ठावंत शिंदे अन् टोपे चर्चेत

पाटील यांच्या राजीनाम्याच्या संकेतांनंतर ‘राष्ट्रवादी’च्या नव्या प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) तसेच राजेश टोपे यांची नावे चर्चेत आली असून, हे दोन्ही शिलेदार शरद पवारांचे निष्ठावंत म्हणून सर्वांना परिचित आहेत. याशिवाय नव्या चेहऱ्यांमध्ये खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो, अशी चर्चा आहे. टोपे यांनी करोनाकाळात आरोग्यमंत्री म्हणून केलेल्या कामाचा उल्लेख ‘राष्ट्रवादी’ कडून केला जात आहे.

पुन्हा तीच इच्छा …तोच गोंधळ…. शरद पवारांच्या सेनापतीबाबतही ‘ते’च घडेल?

शशिकांत शिंदे यांची ताकद काय?

शशिकांत शिंदे हे पश्चिम महाराष्ट्रातील नेते आहेत. सातारा, नवी मुंबई भागात त्यांचा चांगला होल्ड आहे. ते अनुभवी नेते असून त्यांच्या नेतृत्वात पक्ष आक्रमकपणे काम करू शकतो. त्यामुळे शशिकांत शिंदे यांच्या नावाची देखील चर्चा रंगली आहे. मध्यंतरी राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर शशिकांत शिंदे यांनादेखील अनेक पक्षांकडून ऑफर होत्या. मात्र. मी पक्षासाठी काम करणारा कार्यकर्ता असल्याचे सांगत शिंदेंनी त्या स्विकारल्या नाही. माझं एक तत्व आहे, पवारसाहेब एकं पवारसाहेब, आपण त्यांच्यासोबत राहिलं पाहिजे, या विचाराचा मी आहे. त्यामुळे या सर्व राजकीय घडामोडींमध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये काम करत राहणे, आणि त्याचप्रमाणे पुढे जात राहणे. शेवटी पुढे काय होईल ते पाहून घेऊ असा एकच अजेंडा असल्याचेही शिंदेंनी म्हटले होते.

जयंत पाटलांचा राजीनामा अन् पत्र दोन्हीही…; सुप्रिया सुळेंनी सांगितली पडद्यामागची महत्त्वाची घडामोड

शांत-संयमी राजेश टोपे प्रदेशाध्यक्ष झाल्यास मराठवाड्यात फायदा

राजेश टोपे हे मराठवाड्यातील मातब्बर नेते असून मराठा समाजाचे आहेत. सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणूनही राजेश टोपे (Rajesh Tope) यांची ओळख आहे. राजेश टोपे फारसे वादग्रस्त नाहीत. कोरोना काळातील त्यांच्या कामाने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष त्यांनी वेधून घेतले होते. कोणत्याही परिस्थितीत अधिक आक्रमक न होता अगदी संयमीपण परिस्थिती हातळणे असा राजेश टोपे यांचा स्वभाव आहे. त्यामुळे आतापर्यंत कधीच टोपे यांचे नाव वादग्रस्त विधान केले म्हणून किंवा आक्रमक भूमिका घेतली म्हणून चर्चेत आलेले नाही. त्यामुळे टोपे यांच्या या प्रतिमेचा फायदा पवारांच्या राष्ट्रवादीला होऊ शकतो. शिवाय टोपे प्रदेशाध्यक्ष झाल्यास याचा फायदा भविष्यात मराठवाड्यात पक्षाचं जाळं वाढवण्यास होऊ शकतो.

follow us