‘आता आमचं लक्ष्य विधानसभा..’ शरद पवारांनी सांगितला ‘त्या’ तीन महिन्यांचा प्लॅन

‘आता आमचं लक्ष्य विधानसभा..’ शरद पवारांनी सांगितला ‘त्या’ तीन महिन्यांचा प्लॅन

Sharad Pawar on Maharashtra Election 2024 : राज्यात लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर महाविकास (Elections 2024) आघाडीने आता विधानसभा निवडणुकीवर लक्ष (Maharashtra Elections 2024) केंद्रीत केलं आहे. या निवडणुकीच्या तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. निवडणुकीला अद्याप तीन महिने बाकी आहेत. त्याआधीच जागावाटपाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. महाविकास आघाडीचं जागावाटप कसं होणार? कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? असे प्रश्न विचारले जात असतानाच शरद पवार (Sharad Pawar) यांनी याबाबत महत्वाचं वक्तव्य केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. आगामी विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाबाबतही माहिती दिली. ते म्हणाले, आमचं लक्ष सध्या राज्यातील विधानसभा निवडणुकीवर आहे. महाभारतातल्या अर्जुनाला जसा माशाचा डोळा दिसत होता तसाच आता आम्हालाही फक्त राज्यातील निवडणूक दिसत आहे. ही निवडणूक आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित लढणार आहोत.

“चिंता वाटली पण, भारताचा अद्भूत चमत्कार” शरद पवारांची खेळाडूंना कौतुकाची थाप

लोकसभेच्या निवडणुकीत राज्यातील जनतेनं आम्हाला चांगला प्रतिसाद दिला. या निवडणुकीत आम्ही प्रमुख तीन पक्षांत जागावाटप केलं होतं. पण आगामी विधानसभा निवडणुकीत आम्हाला लहान पक्षांनाही बरोबर घेऊन जायचं आहे. त्यांनाही काही जागा द्यायच्या आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांना जागा देता आल्या नव्हत्या पण आता विधानसभा निवडणुकीत आम्ही त्यांचा योग्य मानसन्मान करणार आहोत. सध्या निवडणुकीतील जागावाटपाबाबत आमच्यात कोणतीही चर्चा झालेली नाही. लवकरच चर्चा करून जागांची वाटणी करू असे शरद पवार म्हणाले.

विधानसभा निवडणुकीसाठी आणखी तीन महिन्यांचा काळ बाकी आहे. या तीन महिन्यांचा पुरेपूर उपयोग करुन घेण्याचे आम्ही ठरवले आहे. जागावाटपात ज्या पक्षाला ज्या जागा मिळतील त्या जागांवर उमेदवार देऊन त्यांनी पुढील तयारी करायची आहे. आगामी तीन महिन्यात आम्ही निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी करू असा विश्वास शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

Shashikant Shinde राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष होणार? शिंदेंनी सांगून टाकलं..

पंढरीच्या वारीत पायी चालणार नाही

मी वारीत पायी चालणार अशा ज्या बातम्या येत आहेत त्या खोट्या आहेत. मी बारामती ते सणसरपर्यंत पायी चालणार ही बातमी खोटी आहे. पंढरपुरला जाणरी वारी माझ्या गावावरुन जाते. त्यामुळे या दिंडीच्या स्वागतासाठी मी एक दिवस तेथे थांबणार आहे. मात्र मी पालखीसोबत चालणार नाही. त्यांच्या स्वागतासाठी मात्र मी तिथे थांबणार आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज