RBI : रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) एका बॅंकेच्या खराब प्रशासकीय मानंकांमुळे तिच्यावर कारवाई केली आहे. त्यामध्ये या बॅंकेच्या संचालक मंडळाला 12 महिन्यांसाठी बरखास्त केलं आहे. त्यामुळे या बॅंकेच्या ग्राहकांच्या व्यवहारांवर या कारवाईचा परिणाम होणार का? याची चर्चा सुरू झाली आहे. तर ज्या बॅंकेवर ही कारवाई करण्यात आली ती बॅंक म्हणजे अभ्युदय सहकारी बॅंक लिमिटेड आहे.
आरबीआयकडून 12 महिन्यांसाठी संचालक मंडळ बरखास्त
शुक्रवारी अभ्युदय सहकारी बॅंक लिमिटेडचे संचालक मंडळ बरखास्त करण्याची कारवाई करण्यात आलं आहे. 12 महिन्यांसाठी हे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलं आहे. मात्र या बॅंकेचे व्यवहार ठप्प होऊ नये म्हणून आरबीआयने एक निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता या बॅंकेवर प्रशासक नेमण्यात आला आहे.
Pune News : धक्कादायक ! दुबईत वाढदिवस का साजरा केला नाही ? भांडणामुळे पतीचा गेला जीव
स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे माजी मुख्य महाव्यवस्थापक सत्य प्रकाश पाठक यांची या बॅंकेवर प्रशासक म्हणून नेमण्यात आलं आहे. तसेच या प्रशासकाला त्यांच्या कामामध्ये मदत करण्यासाठी एका सल्लागार समितीची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीमध्ये एसबीआयचे माजी महाव्यवस्थापक व्यंकटेश हेगडे, लेखापाल महेंद्र छाजेड, कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड चे माजी एमडी सुहास गोखले. यांचा समावेश आहे.
पगार मागितला म्हणून तरुणाला मारहाण, तोंडात चप्पल कोंबली; महिला बॉस बनली ‘लेडी डॉन’
…म्हणून या बॅंकेवर कारवाई झाली
रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने अभ्युदय सहकारी बॅंक लिमिटेडवर कारवाई केली कारण या बॅंकेचे व्यावहार आणि प्रशासकीय कामगिरी खराब होती. त्यामुळे त्यांचे प्रशासन मानकं खराब आहेत. त्यामुळे काही समस्या निर्माण झाल्या होत्या. मात्र या बॅंकेवर झालेल्या कारवाईचा बॅंकेच्या व्याहारांवर आणि ग्राहकांवर काहीही परिणाम होणार नाही. सर्व व्यवहार सुरळीत सुरू राहणार आहेत.