Download App

Rohit Pawar यांच्याकडून कथित आश्रमशाळा दूध घोटाळ्याचा पर्दाफाश; 80 कोटींच्या दलालीचा आरोप

Rohit Pawar : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar) यांनी राज्यातील शासकीय आश्रम शाळेत मोठा दूध घोटाळा ( milk fraud ) झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. एका निनावी व्यक्तीने आपल्याला या घोटाळ्याच्या 11 फाईल्स दिल्या असून मी त्याचा बारकाईने अभ्यास केला असल्याचं रोहित पवार म्हणाले आहेत. यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

धंगेकरांना उमेदवारी मिळताच वसंत मोरेंचं ठरलं; हाती ‘हातोडा’ घेऊन अपक्ष मैदानात उतरणार

याबाबत सविस्तर बोलताना रोहित पवार म्हणाले की, राज्यात एकूण 552 शासकीय आश्रम शाळा आहेत. ज्यामध्ये सर्वसामान्य आदिवासी कुटुंबातील लहान मुले शिकतात. त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी सरकारकडून पौष्टिक आहार दिला जातो. ज्यामध्ये 200 एमएल दूध दररोज या विद्यार्थ्यांना दिले जाईल असा जीआर काढण्यात आला आहे. त्यासाठी कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं आहे.

Dhamal 4: जावेद जाफरीने व्हिडिओ शेअर करत ‘धमाल 4’ बाबत दिली मोठी हिंट

जे एक 2018-19 मध्ये आणि 2023-24 मध्ये या वर्षांमध्ये करण्यात आलं आहे. हे दूध अमूल, चितळे, महानंदा यासारख्या कंपन्यांकडून घेऊन टेट्रा पॅकच्या माध्यमातून लहान मुलांना दिलं जातं. या दुधाची एका लिटरची किंमत ही 70-75 रुपये लिटर आहे. यामध्ये 2018-19 मध्ये हा करार झाला होता त्यावेळी 46. 49 पर लिटर असं अमूल, महानंद, आरे, चितळे त्यांच्याकडून दूध घेण्यात आलं होतं. तर त्यानंतर दुसऱ्या एका कॉन्ट्रॅक्टमध्ये अमूल सोबत 50.5 रुपये एका टेट्रा पॅक मागे देण्यात आले.

“आम्हाला पगार नको”, पाकिस्तानच्या पंतप्रधान अन् मंत्र्यांनी नाकारला पगार

तर 2023-24 मध्ये 164 कोटी रुपयांचं कंत्राट देण्यात आलं. त्यामध्ये राज्यभरातील शासकीय आश्रम शाळांमध्ये कोट्यावधी दुधाचे टेट्रा देण्यात आली. मात्र एकीकडे शेतकऱ्यांकडून सरासरी 30 रुपये लिटरने दूध घेतलं जातं. मात्र या कंपन्यांनी या आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना दिलेले दूध हे तब्बल 146 रुपये प्रति लिटर या भावात दिलं आहे. त्यामुळे या गरीब मुलांना दूध देताना सरकारकडून या करारामध्ये 85 कोटी पर्यंत खर्च येणे अपेक्षित होतो. जो 165 कोटींवर गेला आहे. त्यामुळे यामध्ये सरकारने तब्बल 80 कोटींची दलाली दिली असल्याचा गंभीर आरोप यावेळी रोहित पवार यांनी केला आहे.

तसेच सरकारने महानंद या कंपनीला फायद्यामध्ये आणण्यासाठी गुजरातला दिल्याचे सांगितलं. मात्र या सर्व दुधाचं कंत्राट महानंदला देण्यात आलं असत तर 84 कोटींचं प्रॉफिट केवळ महानंदला झाला असता. मात्र यामध्ये पूर्ण कॉन्ट्रॅक्ट एका प्रायव्हेट कंपनीला तसेच सत्तेत असणाऱ्या एका कोल्हापूरच्या नेत्याच्या सहकारी संस्थेला देण्यात आलं. जे दूध शेतकऱ्यांकडून 30 रुपये लिटरने घेण्यात आलं. तेच दूध या गरीब विद्यार्थ्यांना तब्बल 183 रुपये लिटर याप्रमाणे दिले गेले. असे गंभीर आरोप करत रोहित पवार यांनी अजित पवार गटातील सतत सहभागी झालेले हसन मुश्रीफ यांना सवाल केला आहे. ते म्हणाले हा करार जर मार्चमध्ये झाला. तर काही लोक विकासासाठी भाजपसोबत जाण्याचं तीन महिने आधीच ठरलं होतं का? असं पवार म्हणाले आहेत.

follow us