Download App

2 कोटींची संपत्ती, सानपाड्याचा फ्लॅट अन् BMW गाडी, ईडीच्या चौकशीत सचिन सांवतांची संपत्ती उघड…

Image Credit: Letsupp

ईडीच्या रडारवर असलेले ईडीचे अधिकारी सचिन सावंतांची (Sachin Sawant) 2011 साली असलेली दीड लाखांची संपत्ती 2022 मध्ये 2 कोटींपेक्षा अधिक झाली. यासंदर्भात माहिती ईडीच्या चौकशीत समोर आलीय. दरम्यान, बेहिशोबी मालमत्ता आणि भ्रष्टाचाराचा आरोप ठेवत सचिन सावंत यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. ईडीकडून त्यांची चौकशी सुरु आहे.

शिंदे-फडणवीस सरकारची वर्षपूर्ती! अभूतपूर्व राजकीय नाट्यानंतर ‘शिंदेशाही’ला झाली होती सुरुवात…

नेमकं प्रकरण काय?

सचिन सावंत हे आयआरएस अधिकारी असून ते जीएसटी विभागात कार्यरत होते. 2008 साली त्यांची भारतीय महसूल सेवेत निवड झाली. त्यानंतर 2017 ते 2019 या काळात त्यांची ईडीच्या मुंबई प्रादेशिक कार्यालयात उपसंचालकपदी नियुक्ती झाली. याचदरम्यान, मुंबईतील हिऱ्यांच्या व्यापाऱ्यांकडून 500 कोटी रुपयांचं मनी लॉड्रिंग झाल्याचं प्रकरण समोर आलं होतं.

अर्धसत्य तोंडावर आले, गुगली टाकून पूर्णसत्य बाहेर आणणार ! फडणवीसांचे शरद पवारांना जोरदार प्रत्युत्तर

त्यानंतर सचिन सांवत यांची लखनौमध्ये सीमा शुल्क विभागात बदली झाली खरी पण सावंतांचा या प्रकरणात हात असल्याचं समोर आलं. या प्रकरणी सीबीआयकडून सचिन सावंत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याचं आधारे आता ईडीने त्यांच्या मालमत्तांवर छापेमारी करीत कारवाई केलीय.

शिंदेंना सोडून अजितदादांना सोबत घ्यायचा प्लॅन होता का? काय म्हणाले फडणवीस

ईडीने केलेल्या तपासात 2011 साली सचिन सावंतांची 1 लाख 40 हजार रुपयांची संपत्ती होती. त्यानंतर 2022 मध्ये त्यांची संपत्ती 2 कोटींपेक्षा अधिक झाली. तर त्यांचा एकूण खर्च 2 कोटी 45 लाख 78 हजार 579 इतका झाल्याचं तपासात उघड झालंय. एवढंच नाहीतर सानपाडामधील फ्लॅटचीही चौकशी ईडीकडून सुरु आहे. तर 2009 मध्ये मनाोज लुंगड यांच्या नावे एक बीएमडब्लू गाडी खरेदी करण्यात आली. ही गाडी सचिन सावंत यांची बेनामी होती असा दावा ईडीकडून करण्यात आला आहे.

दरम्यान, सचिन सावंत यांना 5 जुलैपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली असून पुढील चौकशीत आणखी खुलासे समोर येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज