ज्‍येष्‍ठ साहित्यिक राजाभाऊ शिरगुप्पे यांचं कोल्हापुरात निधन

Rajabhau Shirguppe : साहित्य क्षेत्रामधून मोठी बातमी समोर आली आहे.ज्येष्ठ साहित्यिक राजाभाऊ शिरगुप्पे यांचं निधन झालं आहे. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यांना कोल्हापुरात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. एका लव्हस्टोरीचा द एन्ड : सचिन पायलट, सारा यांचा घटस्फोट; निवडणूक प्रतिज्ञापत्रातून आले उघडकीस राजाभाऊ शिरगुप्पे मूळचे निपाणीचे होते. […]

Rajabhau Shirguppe passes away

Rajabhau Shirguppe

Rajabhau Shirguppe : साहित्य क्षेत्रामधून मोठी बातमी समोर आली आहे.ज्येष्ठ साहित्यिक राजाभाऊ शिरगुप्पे यांचं निधन झालं आहे. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यांना कोल्हापुरात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

एका लव्हस्टोरीचा द एन्ड : सचिन पायलट, सारा यांचा घटस्फोट; निवडणूक प्रतिज्ञापत्रातून आले उघडकीस

राजाभाऊ शिरगुप्पे मूळचे निपाणीचे होते. ते गेले अनेक वर्षांपासून साताऱ्यात वास्तव्याला होते. मागील दोन महिन्यांपूर्वी त्यांची तब्येत बिघडली होती. उपचारासाठी त्यांना कोल्हापुरातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

Maratha Reservation : आरक्षणासाठी राजीनामा सत्र सुरूच…; ठाकरे गटाच्या नगरसेविकेनं दिला राजीनामा

राजाभाऊ शिरगुप्पे यांनी साहित्य क्षेत्रासाठी मोठं योगदान दिलं आहे. पथनाट्य, नाटक, चित्रपट, कविथा, समीक्षा लेखन इ क्षेत्रात त्यांच्या कार्याचा ठसा दिसून येतो.

Mukesh Ambani : धमकी सत्र सुरुच! अंबानींना तिसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी

महाराष्ट्रा-कर्नाटक सीमेवरील निपाणीच्या तंबाखू कामगार चळवळीपासून त्यांना सामाजिक कार्याला सुरुवात केली होती. साहित्य क्षेत्रातील योगदानासह राजाभाऊ शिरगुप्पे विद्रोही सांस्कृतिक चळवळीसह प्रगतशील चळचळीत त्यांचा सक्रीय सहभाग होता.

बेळगाव सीमाप्रश्न पुन्हा तापला : ‘काळा दिवस’वरुन महाराष्ट्र-कर्नाटक सरकार आमने-सामने

राजाभाऊ शिरगुप्पे हे सांगलीत झालेल्या विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या संमेलनाचे ते अध्यक्ष होते. राजाभाऊंच्या मागे पत्नी प्रा. मीना शिरगुप्पे, चित्रकार मुलगा रोहन, मुलगी अनुजा, सून असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे चळवळीची मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त होताना दिसत आहे.

Exit mobile version