Download App

‘डॉट असलेली आघाडी कधीच..,’; राहुल शेवाळेंनीही ‘इंडिया’ आघाडीला सोडलं नाही

Rahul Shewale : डॉट असलेली आघाडी कधीच यशस्वी होत नसल्याची टीका शिंद गटाचे खासदार राहुल शेवाळे(Rahul Shewale) यांनी केली आहे. मुंबईत ‘इंडिया'(India) आघाडीची बैठक पार पडत आहे, या बैठकीसाठी देशभरातून भाजपविरोधी पक्षाचे नेते आले आहेत. या बैठकीवर राहुल शेवाळेंनी निशाणा साधला आहे.

Jawan मधील व्हायरल डायलॉगनंतर समीर वानखेडेंनी किंग खानला दिलं उत्तर? म्हणाला…

खासदार शेवाळे(Rahul Shewale) म्हणाले, ‘इंडिया’ आघाडीचे नेते बैठकीसाठी इंडियाचे आलेले नसून पर्यटनासाठी आलेले आहेत, त्यांची पुढची पिढी सेटल करण्साठी ते आलेत, कारण बैठकीला आले असते, तर बैठकीआधी बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर गेले असते पण गेले नसल्याची टीका राहुल शेवाळे यांनी केली आहे.

लवकर निवडणुका घेण्यासाठी भाजपच्या हालचाली, त्यासाठीच विशेष अधिवेशन; रोहित पवारांची भाजपवर टीका

तसेच ज्या आघाडीचा लोगो अद्याप फायनल झाला नाही, अशी आघाडी कितपत टिकणार आहे. ज्या आघाडीमध्ये डॉट आहेत ती आघाडी कधीच यशस्वी होऊ शकत नाही. लोगो जाहीर न झाल्याने इंडियामध्ये एकवाक्यता दिसून येत नाही त्यामुळे आपल्याला डॉट दिसून येत आहेत, ते डॉट भविष्यातही दिसतीलच, अशीही टीका राहुल शेवाळे(Rahul Shewale) यांनी केली आहे.

Adani Group : हिंडेनबर्गनंतर OCCRP ने सादर केला रिपोर्ट; तीन तासांत 35 हजार कोटी स्वाहा!

उदय सामंतांची जहरी टीका :
आगामी लोकसभेच्या निवडणुकीत 375 पेक्षा अधिक जागांवर आमचाच विजय होणार असून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदीच होणार आहेत, तसेच विधानसभेच्या निवडणुकीत 215 पेक्षा अधिक आमदार महायुतीचे निवडून येणार आहेत, इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी आलेल्या नेत्यांचं मुंबईत स्वागत आहे तुमच्या बैठकीचा काहीही परिणाम होणार नसून पर्यटनाला आलेल्या 65 नेत्यांना शुभेच्छा, असंही उदय सामंत म्हणाले आहेत.

दरम्यान, भाजपला पराभूत करण्यासाठी देशभरातल्या 28 विरोधी पक्षांनी इंडिया आघाडीची स्थापना केली असून सध्या मुंबईत इंडिया आघाडीच तिसरी बैठक पार पडत आहेत. काल झालेल्या बैठकीनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. त्यावरुन भाजप-इंडिया आघाडीच्या नेत्यांमध्ये चांगलंच वाकयुद्ध पेटल्याचं दिसून आलं आहे. अशातच आता शिंदे गटाचे मंत्री उदय सामंतांसह खासदार राहुल शेवाळे यांनीही टीका केल्याने या टीकेवर इंडिया आघाडीतील नेते काय प्रत्युत्तर देतील? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us