लवकर निवडणुका घेण्यासाठी भाजपच्या हालचाली, त्यासाठीच विशेष अधिवेशन; रोहित पवारांची भाजपवर टीका

लवकर निवडणुका घेण्यासाठी भाजपच्या हालचाली, त्यासाठीच विशेष अधिवेशन; रोहित पवारांची भाजपवर टीका

Rohit Pawar on BJP : संसदेचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर लगेचच संसदेचे पाच दिवसांचे विशेष अधिवेशन (special session) बोलावण्यात आले आहे. या परिषदेचा कालावधी 18 ते 22 सप्टेंबर असा निश्चित करण्यात आला. या अधिवेशनात मोदी सरकार एक देश एक निवडणूक हे विधेयक मंजूर करण्याच्या तयारीत आहे, असं बोलल्या जातं आहे. दरम्यान, यावरून आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केली आहे. निवडणुकांना जेवढा उशीर होईल, पराभव देखील तेवढाच मोठा होईल हे भाजपला (BJP) कळून चुकले. म्हणून लवकरात लवकर निवडणुका घेण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले, अशी टीका त्यांनी केली.

मोदी सरकारला पराभूत करण्यासाठी विरोधक एकटवले आहेत. विरोधकांच्या इंडिया आघाडीची तिसरी बैठक सध्या मुंबईत सुरू आहे. जनाधार आणि विरोधकांची एकजूट पाहता भाजपने धसका घेतल्याचं बोलल्या जात आहे. दरम्यान, रोहित पवार यांनी ट्विट केले करत लिहिलं की, “इंडिया दिवसेंदिवस मजबूत होत असल्यानं भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. महागाई, बेरोजगारी, सध्याची दुष्काळीजन्य परिस्थिती यांसारखे जनतेचे मूळ मुद्दे आता चर्चत येत असल्यानं लोकांना भाजपा सरकारचा खरा चेहरा कळायला सुरूवात झाली आहे.

परिणामी, गेली दहा वर्षे जनतेल गृहीत धरून चालणाऱ्य केंद्र सरकारला सिलिंडरच्या किमती कमी करण्याचा साक्षात्कार झाला. येणाऱ्या काळात पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करणे यासारखे अजून खूप सारे साक्षात्कार होतीलही, अशी टीकाही रोहित पवारांनी केली.

‘व्हायग्रा’चा शरीरावर नेमका काय परिणाम होतो ? मृत्यू येतो का ? जाणून घेऊया… 

त्यांनी लिहिलं की, निवडणुकांना जेवढा उशीर होईल, पराभव देखील तेवढाच मोठा होईल, हे भाजपला कळून चुकले आहे. त्यामुळे लोकांना सरकारचा खरा चेहरा समजण्यासाठी आणि इंडिया अधिक मजबूत होण्यासाठी अधिकचा वेळ मिळू नये, यासाठी भाजपा प्रयत्नशील असून लवकरात लवकर निवडणुका घेण्यासाठी भाजपच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कदाचित त्यामुळेच संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची गरज पडली असेल, हे नाकारता येत नाही, असं रोहित पवार म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube