Download App

कांताबाई अंधारे कसदार जमीन अन् मी दमदार पीक, सुषमा अंधारेंना अश्रू अनावर

कांताबाई अंधारे कसदार जमीन आणि मी दमदार पद्धतीने उगवून आलो, असल्याचं म्हणत ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी विरोधकांना जोरदार प्रत्त्युत्तर दिलं आहे. साताऱ्यात भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्था पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात सुषमा अंधारे यांना बोलताना अश्रू अनावर झाले आहेत. विशेष म्हणजे या कार्यक्रमा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही हजेरी लावली होती. शरद पवारांसमोरच त्यांना अश्रू अनावर झाले आहेत.

‘The Kerala Story’ निर्मात्याला फासावर लटकवलं पाहिजे, जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल

सुषमा अंधारे म्हणाल्या, माझ्या बापाबद्दल लोकं वाटेल त्या पद्धतीने बोलत आहेत. कसं असतंय, शेतात नांगरणी होते त्यानंतर पेरणी, आणि मग पहिला पाऊस होतो. पाऊस झाल्यानंतर कसदार पीक येतं.

लग्नाचा वाढदिवस…सेलिब्रेशन सुरु होतं अन् क्षणात दुःखाचा डोंगर कोसळला

कणंसं येतात. कणसं भरल्यानंतर मळणी यंत्रणातून धान्य येतं. त्यावेळी येणारे-जाणारे त्या धान्याच्या ढिगाकडे पाहुन दुसरा माणूस म्हणतो, पीकाकडे काय बघतो, जमीनच एवढी भारी आहे तर पीकं तर येणारचं, या शब्दांत अंधारेंनी विरोधकांना सुनावलंय.

Khargone Bus Accident : मध्यप्रदेशात मोठा अपघात; 50 फूट नदीत बस कोसळली, 15 जणांचा मृत्यू

तसेच ज्या जमीनीतून मी उगवून आले आहे, ती जमीन कांताबाई अंधारे हे कसदार जमीन आहे, अन् आम्ही दमदार पद्धतीने उगवून आलो असल्याचं त्या म्हणाल्या आहेत.

या देशात वाघांची, हत्तींची गणना होते, पण भटक्यांची जनगणना व्हावी, असं सरकारला वाटत नाही. जनावरांपेक्षा आमची वाईट अवस्था आहे अशी खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सुषमा अंधारेंवर राजकीय नेत्यांकडून टीका-टिप्पणी केली जात आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट आणि सुषमा अंधारे यांच्यात चांगलंच वाकयुद्ध रंगलं होतं. यावेळी संजय शिरसाट यांची सुषमा अंधारेंवर टीका करीत असताना जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं होतं.

Tags

follow us