‘The Kerala Story’ निर्मात्याला फासावर लटकवलं पाहिजे, जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल

‘The Kerala Story’ निर्मात्याला फासावर लटकवलं पाहिजे, जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल

Jitendra Awhad On The Kerala Story: ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) सिनेमावरून देशभर वाद सुरू आहे. भाजपाशासित राज्यात हा सिनेमा ‘टॅक्स फ्री’ करण्यात येत आहे. तर, दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) या सिनेमावर बंदी घालण्यात आली आहे. (Jitendra Awhad On The Kerala Story) अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ‘द केरला स्टोरी’ सिनेमाबद्दल खळबळजनक वक्तव्य केले आहे. सिनेमा निर्मात्याला फासावर लटकावले पाहिजे, असे जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी म्हटले आहे.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले नेमकं?

‘द केरला स्टोरी’ सिनेमाच्या नावाखाली एका राज्याची आणि तेथील महिलांची बदनामी करण्यात आली. अधिकृत आकडा ३ महिलांचा आहे, सिनेमात ३२ हजार दाखवण्यात आलं आहे. ज्याने या सिनेमाची निर्मिती केली आहे, त्याला सर्वाजनिकरित्या फासावर लटकवले पाहिजे, असे खळबळजनक वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

जितेंद्र आव्हाड ट्वीट करत म्हणाले की, ‘केरळच्या नावाने प्रदर्शित झालेला सिनेमा हा खोटारडेपणाच्या परमोच्च स्थानावर आहे. केरळची सत्य परिस्थिती वेगळी आहे. विदेशातून भारतात येणारा जो पैसा आहे, त्याच्यातील ३६ टक्के पैसा हा केरळचे नागरिक पाठवत आहेत. गेल्यावर्षी त्यांनी २.३६ लाख कोटी रुपये पाठवले होते. केरळचा साक्षरतेचा दर ९६ टक्के आहे, भारत देशाचा ७६ टक्के आहे.

केरळमध्ये दारिद्र्य रेषेखाली राहणाऱ्या नागरिकांची संख्या ०.७६ टक्के इतकी आहे. देशातील दारिद्र्य रेषेखालील नागरिकांची संख्या २२ टक्के आहे. बालमृत्यूचे प्रमाण केरळमध्ये ६ टक्के आहे. आसाममध्ये ४२ टक्के तर, उत्तरप्रदेशमध्ये ४६ टक्के आहे. केरळचे दरडोई उत्पन्न हे भारताच्या ७ टक्के अधिक आहे, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी दिली आहे.

Salman Khan धमकीप्रकरणी मोठी अपडेट; मेल प्रकरणी एका विद्यार्थ्याविरुद्ध लुकआउट नोटीस

या सिनेमामध्ये ३२ हजार महिलांची कहाणी सांगितली आहे, त्याबद्दल स्वतः सिनेमाचा निर्माता म्हणाला की, ही कथा फक्त ३ महिलांची आहे. सिनेमा चालण्यासाठी ३२ हजार महिला सांगितले होते. म्हणजे एकंदरीत काय तर आपल्या महिला भगिनींची बदनामी करायची. आपल्या महिला भगिनी मूर्ख आहेत, त्यांना काही समजतच नाही, त्या वाटेल तशा वागतात असे त्यांना दाखवायचं आहे, असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube