Thackeray Vijay Melava : ठाकरे बंधू हिंदी सक्ती प्रकरणावरुन गेल्या काही दिवसापासून महायुती सरकारवर हल्लाबोल करताना दिसत आहे. हिंदी सक्ती रद्द करण्यात यावी अशी मागणी मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून होत होती. तर काही दिवसांपूर्वी राज्य सरकारकडून पहिलीपासून हिंदी सक्ती जीआर (GR) रद्द करण्यात आल्याने आज ठाकरे बंधूंकडून मुंबईत (Mumbai) विजयी मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. या मेळाव्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मनसे आणि ठाकरे गटात युती होणार का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
वरळीच्या डोम येथे होणाऱ्या या विजयी मेळाव्यासाठी (Thackeray Vijay Melava) जोरदार तयारी देखील सुरु आहे. पुढील काही दिवसात राज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार असल्याने मुंबई महानगर पालिका निवडणुकासाठी ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चे सुरु असल्याने राज आणि उद्धव ठाकरे या मेळाव्यातून काय बोलणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
ब्रेकिंग! लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता कधी मिळणार? मंत्री आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली
तर दुसरीकडे संपूर्ण राज्यातून होत असलेल्या विरोधानंतर सरकारने त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेतला आहे. यासाठी आता नरेंद्र जाधव समिती स्थापन करण्यात आली. या समितीचा अहवाल आल्यानंतरच सरकारकडून याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणींत वाढ; हक्कभंग प्रकरणात विधिमंडळाने प्रस्ताव केला मंजूर