Download App

राज्यातील शिक्षकांसाठी मोठी बातमी; विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षकांनाही ड्रेसकोड अनिवार्य

Uniform for Teacher : विद्यार्थ्यांच्या गणवेशाबाबत नेहमीच काही ना काही बदल झाल्याचं आपण नेहमीच ऐकतो. मात्र यावेळी विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या शिक्षकांसाठी देखील ड्रेसकोड अनिवार्य ( Uniform for Teacher ) करण्यात आला आहे. त्यामुळे त्या राज्यातील सर्व शिक्षकांनाही विद्यार्थ्यांप्रमाणेच ठरवून दिलेल्या गणवेशाचे पालन करावे लागणार आहे. अशी महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे.

Loksabha Election 2024 : राज्यात युती की आघाडी कोण ठरणार भारी? ओपिनियन पोलने भाजपची धाकधूक वाढली

शिक्षकांच्या शिकवण्याबरोबरच त्यांच्या वर्तणुकीचा देखील विद्यार्थ्यांवर परिणाम होत असतो. ही गोष्ट लक्षात घेऊन राज्यातील सर्व संबंधित व्यवस्थापनांच्या शाळांतर्गत कार्यालयात शिक्षकांकरता दैनंदिन पेहराव कशा पद्धतीचा असावा? याबाबत शिक्षण विभागाने काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

पुणे महानगरपालिका आयुक्तपदी राजेंद्र भोसले, विक्रम कुमार यांच्यावर एमएमआरडीएची जबाबदारी

यामध्ये महिला शिक्षकांनी साडी अथवा सलवार चुडीदार कुर्ता तसेच पुरुष शिक्षकांनी शर्ट आणि ट्राऊझर पॅन्ट परिधान करावी यामध्ये पुरुष शिक्षकांना देखील जीन्स टी-शर्ट चालणार नाही त्याचबरोबर चित्रविचित्र नक्षीकाम असलेले ड्रेस देखील शिक्षकांनी घालण्यावर शालेय शिक्षण विभागाने बंदी घातली आहे.

Pune : टायरमध्ये घालण्याचा इशारा देणाऱ्या अजित पवारांकडून मोक्काच्या आरोपीची सुटका

हा निर्णय घेताना शिक्षण विभागाने म्हटले आहे की राजकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी अल्पसंख्यांक इत्यादी सर्व व्यवस्थापना अंतर्गत अनुदानित अंशतः अनुदानित विनाअनुदानित स्वयम अर्थसाहित तसेच अल्पसंख्यांक व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या व सर्व बोर्डाच्या शाळेतील कार्यशिक्षक हे भावी पिढी घडवीत असतात.

यावेळी त्यांच्या शिकवण्या सोबतच त्यांच्या वेशभूषेचा देखील विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाचा वाटा असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करत असताना वेशभूषेबद्दल जागरूक राहून आपली वेशभूषा ही शाळेत आणि आपल्या पदास किमान अनुरूप ठरेल. अशी सर्वतोपरी काळजी घेणं शिक्षकांकडून अपेक्षित आहे.

follow us