धक्कादायक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्ताचे डाग, मासिक पाळी तपासण्यासाठी विद्यार्थीनींना केलं विवस्त्र

धक्कादायक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्ताचे डाग,  मासिक पाळी तपासण्यासाठी विद्यार्थीनींना केलं विवस्त्र

stains in school toilet, students were made to undress to check their periods in Thane : ठाण्यातील एका शाळेतून एक संवेदनशील आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. शाळेतील टॉयलेटमध्ये रक्ताचे डाग आढळून आल्याने विद्यार्थीनींना थेट कुणाला मासिक पाळी आलेली आहे. असा प्रश्न विचारण्यात आला. धक्कादायक म्हणजे ज्यांनी माहिती दिली नाही. त्यांना टॉयलेटमध्ये नेऊन कपडे काढायला लावून तपासणी करण्यात आली आहे. ही घृणास्पद घटना ठाणे जिल्ह्यातील शाहपूर तालुक्यातील एका संस्थेच्या शाळेमध्ये घडली आहे. याप्रकरणी आता मुख्यध्यापिकेसह अनेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

ठाणे जिल्ह्यातील शाहपूर तालुक्यातील एका संस्थेच्या शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्ताचे डाग आढळून आले होते. त्यानंतर हे डाग कसे काय पडले? हे शोधून काढले गेले. हे डाग मासिक पाळीचे असतील असं समजून थेट विद्यार्थींना विचारणा करण्यात आली. त्यासाठी पाचवी ते दहावीच्या विद्यार्थीनींना एका हॉलमध्ये एकत्र बोलावण्यात आलं.

क्रिकेटच्या नावाखाली भ्रष्टाचार! IPL 2025 तिकीट घोटाळा प्रकरणी मोठी कारवाई, बडा अधिकारी ताब्यात

त्यावेळी त्यांना कुणाला मासिक पाळी सुरू आहे का? अशी थेट विचारणा करण्यात आली. त्यामध्ये अनेक मुलींना आपल्याला मासिक पाळी सुरू आहे. असं सांगत हात वर केले.त्यांच्या नावं लिहून घेण्यात आली. ज्यांनी हात वर केले नाही. त्यांना टॉयलेटमध्ये नेऊन कपडे काढायला लावून मासिक पाळी सुरू आहे किंवा नाही. याची तपासणी करण्यात आली.

विजय देवरकोंडा ते राणा दग्गुबाती.. 29 सेलेब्रिटी ED च्या कचाट्यात, गंभीर प्रकरणात कारवाई

धक्कादायक म्हणजे या घटनेनंतर अनेक विद्यार्थीनींना धक्का बसला. अनेकींना जेवण करणे सोडले. तर पालकांना याबाबत माहिती दिल्यानंतर घटनेच्या दुसऱ्या दिवशी शाळेच्या परिसरात आंदोलन केले गेले. पालकांनी शाळा प्रशासनावर कडक कारवाई करण्याची मागणी केली. याबाबत पोलिसांनी शाळेच्या मुख्यध्यापक ,दोन शिक्षिका, एक प्युन, दोन ट्रस्टीजवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोघांना अटक देखील करण्यात आली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube