Education : “शिक्षकांनी सभ्यतेचे उदाहरण व्हावे”; ड्रेस कोडबाबत राज्य सरकारची नियमावली
Aasam Goverment School Teacher Uniform : तुम्ही एक स्त्री आहात आणि शिक्षिका आहात. त्यामुळे तुम्ही शिकवण्यासाठी जीन्स किंवा लेगिंग घालून शाळेत जाऊ शकत नाही. आसामच्या शिक्षण विभागाने असा आदेश काढला आहे. राज्याचे शिक्षण मंत्री रनोज पेगू यांनी ट्विट करून हा ड्रेस कोड जारी केला आहे.
काय म्हटले आहे नोटिफिकेशनमध्ये :
काही शिक्षकांना त्यांच्या इच्छेनुसार कपडे घालून शैक्षणिक संस्थांमध्ये जाण्याची सवय लागल्याचे दिसून आले आहे. असे कपडे सामान्यतः लोकांमध्ये स्वीकार्य नसतात. विशेषत: जेव्हा तो आपले कर्तव्य बजावत असतो तेव्हा शिक्षकाने संपूर्ण सभ्यतेचे उदाहरण मांडावे अशी अपेक्षा असते. म्हणूनच सन्मान, शालीनता आणि गांभीर्य दर्शवणारा ड्रेस कोड असणे आवश्यक झाले आहे.
Wrestlers Protest : ‘नार्को टेस्ट करायला तयार पण…,’ बृजभूषण शरण सिंह यांनी कुस्तीपटुंना घातली अट
विहित ड्रेस कोडनुसार पुरुष शिक्षकांनी केवळ औपचारिक पोशाख परिधान करावा. फक्त शर्ट-पँट स्वीकार्य असेल. महिला शिक्षिकांनी सलवार सूट/साडी/मेखेला-चादर परिधान केले पाहिजेत. शिक्षकांनी स्वच्छ व सभ्य रंगाचे कपडे परिधान करावेत. चमकदार नाही. कॅज्युअल आणि पार्टी पोशाख घालणे पूर्णपणे टाळा, असे या नोटिफिकेशन मध्ये म्हटले आहे.
शिक्षणमंत्र्यांच्या ट्विटवर लोकांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या. सरकारच्या या सूचनेवर काहींनी टीका केली तर काहींनी कौतुकही केलं.
प्रियांका नावाच्या एका ट्विटर युजरने रनोज पेगूच्या ट्विटला उत्तर देताना आक्षेप नोंदवला. त्यांनी लिहिले, सूचना अगदी अस्पष्ट आहेत. शासनाने नियमित वर्गांसाठी शिक्षकांचा ड्रेस ठरवावा. काय घालायचे आणि कसे घालायचे हे ठरवणे वेळखाऊ असू शकते आणि यामुळे आमच्या अतिरिक्त खर्चातही भर पडते.
Video : मोदींच्या ‘या’ वक्तव्याने झाला होता हंगामा
जयंत कुमार बरुहा नावाच्या यूजरने कौतुक केले. त्यांनी लिहिले, आसाम सरकारचा हा एक चांगला उपक्रम आहे. जे आपल्या मूळ वारशाचा मोठ्या प्रमाणात संवर्धन करेल. खूप खूप धन्यवाद सर.
प्रत्येकाने या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे लागेल, असे सूचनेच्या शेवटच्या ओळीत लिहिले आहे. अन्यथा कारवाई करण्याचा इशारा या नोटिफिकेशनमध्ये दिला आहे.