Prakash Ambedkar News : लोकसभा निवडणुकीचं (Loksabha Election) बिगुल वाजलंय. निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची लगबग सुरु आहे. अशातच अकोला मतदारसंघात (Akola Loksabha) वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) स्वत:चा अर्ज दाखल केलायं. या अर्जाच्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्या संपत्तीची माहिती दिलीय. या माहितीनूसार त्यांच्याकडे एकही वाहन आणि कुठल्याही प्रकारचं कर्ज नसल्याचं सांगण्यात आलं आहे. तर आंबेडकरांकडे सध्या स्थावर आणि जंगम (Prakash Ambedkar Property) अशी मिळून किती संपत्ती आहे? याचाही उलगडा त्यांनी केलायं. पाहुयात आंबेडकरांची संपत्ती नेमकी कितीये….
आम्ही जाऊन आणखी बिघाड… म्हणून मविआशी समझोता तुटला; आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं
लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून वंचितच्या प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी अनेक शर्थीचे प्रयत्न झाले मात्र, जागावाटपावरुन वंचित आणि महाविकास आघाडीची युती फिस्कटली. अखेर आज आंबडेकरांनी महाविकास आघाडीत वंचित पक्ष नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तर युती तुटण्याआधीच आंबेडकरांनी वंचितच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आणि अकोला लोकसभेतून उमेदवारी अर्ज भरला आहे. अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी स्थावर आणि जंगम मालमत्तेचा उल्लेख केलायं.
Akshay Kumar: तब्बल 17 वर्षांनंतर पुन्हा पडद्यावर एकत्र दिसणार अक्षय कुमार आणि फरदीन खान
प्रकाश आंबेडकर यांच्याकडे एकूण जंगम मालमत्ता 45 लाख 92 हजार 123 इतकी आहे तर पत्नी अंजली आंबेडकर यांच्याकडे 1 कोटी 17 लाख 123 रुपये इतकी आहे. तर मुलगा सुजात आंबेडकरांकडे 45 लाख 64 हजार 34 रुपये इतकी जंगम मालमत्ता आहे. अर्थात प्रकाश आंबेडकर यांच्यासह कुटुंबातील सदस्यांची मिळून 2 कोटी 8 लाख 56 हजार जंगम मालमत्ता असल्याचं सांगण्यात आलं आहे.
जंगम मालमत्तेशिवाय आंबेडकरांनी स्थावर मालमत्तेचाही उल्लेख केलायं. आंबेडकर कुटुंबियांकडे एकूण 7 कोटी 17 लाख 55 हजार 104 रुपयांची स्थावर मालमत्ता असल्याचं खुद्द आंबेडकरांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केलं आहे. त्यापैकी प्रकाश आंबेडकरांच्या नावे 37 लाख तर वडिलोपार्जित मालमत्ता 1 कोटी 28 लाख रुपये इतकी आहे. तर पत्नी अंजली आंबेडकरांच्या नावे 2 कोटी 52 लाख 55 हजार 104 रुपयांची मालमत्ता आहे. तर मुलगा सुजात आंबेडकर यांच्या नावे वडिलोपार्जित 3 कोटी रुपयांची मालमत्ता आहे.
दरम्यान, आंबेडकरांची सध्या एकूण स्थावर मालमत्ता 7 कोटी 17 लाख 55 हजार 104 रुपयांची आहे. याआधी पाच वर्षांपूर्वी त्यांची एकूण स्थावर मालमत्ता 4 कोटी 62 लाखांची होती.