प्रकाश आंबेडकरांविरोधात काँग्रेसने उतरविला उमेदवार ! अभय पाटलांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब !
Abhay Patil has been announced candidate : अकोल्यात महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) उमेदवार ठरला आहे. डॉ. अभय पाटील (Dr. Abhay Patil) यांच्या नावावर महाविकास आघाडीच्या बैठकीत शिक्कामोर्तब झालं आहे. पाटील हे ४ एप्रिल रोजी कॉंग्रेस नेते आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसमध्ये बंपर भरती, महिन्याला मिळणार 45 हजार रुपये पगार
महाविकास आघाडीत अकोला मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला गेला. प्रकाश आंबेडकर यांनी जरी महाविकास आघाडीसोबत काडीमोड घेतला तरी आतापर्यंत नागपूर आणि कोल्हापूर या दोन मतदारसंघात त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे अकोल्यात काँग्रेस आंबेडकरांना पाठिंबा देणार असल्याची चर्चा राज्यातील राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र, या चर्चेंवर स्थानिक मविआच्या नेत्यांनी अभय पाटील यांचं नाव सुचूवत चर्चांना पूर्णविराम दिला आहे. हे शक्य नाही, आमचं ठरलंय. अकोल्यात अभय पाटील उमेदवार असतील, असे तिन्ही पक्षप्रमुखांचे म्हणणं आहे.
महाराष्ट्र सदन घोटाळ्यात भुजबळ पुन्हा अडचणीत ? अंजली दमानियांचा पाठपुराव्यानंतर सुनावणी होणार
देशातील जनतेचा कल काँग्रेसकडे आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडे वळल्याचा दावा केला जात आहे. या संधीचा फायदा घेण्यासाठी काँग्रेसने उच्चविद्याविभूषित, सर्वसामान्यांशी नाळ जोडलेले डॉ. अभय पाटील यांना मैदानात उतरणार असल्याची चर्चा सुरू होती. दरम्यान, आज अभय पाटील यांच्या निवासस्थानी मविआची बैठक झाली. या बैठकीला अकोल्यातील महाविकास आघाडीचे तिन्ही घटक पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीला ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख, शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांच्यासह ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाळ दातकर उपस्थित होते. याच बैठकीत अभय पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं.
तयारी लागा. 4 एप्रिलला अर्ज दाखल करायचा. दोन दिवसांत एबी फॉर्म दिला जाईल, अशा सूचना वरिष्ठपातळीवरून आल्या. त्या अनुषंगाने मविआची बैठक झाली, असं पाटील यांनी सांगितलं. या बैठीकत प्रचार आणि इतर काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आल्याची माहिती पाटील यांनी दिलीय
कोण आहेत अभय पाटील?
अकोला लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांच्या यादीत डॉ. अभय पाटील याचं नाव आघाडीवर होते. त्यांचे वडील डॉ. के. एस. पाटील हे विश्व हिंदू परिषदेत सक्रिय होते. डॉ. अभय पाटील हे सध्या काँग्रेसचे प्रदेश सचिव आहेत. डॉ. अभय पाटील यांनी 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने जिल्ह्यात संघटनात्मक मोर्चेबांधणी सुरू केली होती. त्यांनी जिल्हाभर बैठका आणि दौरे वाढवले. मराठा मोर्चाच्या निमंत्रकांपैकी एक असलेले डॉ.पाटील यांना जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे.
दरम्यान, अकोल्यात वंचितकडून प्रकाश आंबेडकर आणि महायुतीकडून अनुप धोत्रे लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. आता कॉंग्रेसने अभय पाटील यांनाही निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्यानं अकोल्यात तिरंगी लढत होणार आहे.