Bachhu Kadu On Navneet Rana : मैदान कोणतंही ठेवा राणा जीत हमारी होंगी, या शब्दांत प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांना ललकारलं आहे. अमरावती मतदारसंघात प्रहारचे उमेदवार दिनेश बुब मैदानात उतरले आहेत. त्यांच्या प्रचारार्थ आज जाहीर सभा पार पडली. या सभेत ते बोलत होते. दरम्यान, जाहीर सभा घेण्यावरुन काल बच्चू कडू आणि पोलिस प्रशासनांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं होतं. अखेर आज बच्चू कडू यांची सभा पार पडली. या सभेतून बच्चू कडू यांनी कालच्या खडाजंगीवरुन थेटपणे भाष्य करीत नवनीत राणा यांच्यासह रवी राणा यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे.
बच्चू कडू म्हणाले, मैदान कोणतंही ठेवा राणा जीत हमारी होंगी…तुम्ही कबड्डी, क्रिकेट, खो-खो, कुस्ती खेळाल तर आम्ही तुम्हाला उचलून आपटणार आहोत. तुम्ही जिथून येताल तिथून आम्ही तुम्हाला रोखणार आहोत. यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी सनी देओलची डायलॉगबाजी केली आहे. ते म्हणाले, मी आता सनी देओलच्या रोलमध्ये आहे.. ये ताकद मजदूर की है…ये कालिया ये ताकद मजदूर की है…अगर हातोडा उठा लेता है…तो मुसिबत खडी होती है…हल चलाता है तो जमीन भी फाड देता है किसान…तू हमसे टक्कर मत ले ये किसान की अवलाद खडी है यहा..या शब्दांत बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यांना थेट इशाराच दिला आहे.
तसेच ज्यांनी ज्यांनी आम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला आहे.. अब तू कहा गिरेगा तुझेही पता नही चलेगा..आजच्या सभेला हजर राहुन हे सर्वसामान्य जनतेने दाखवून दिलं आहे. मागील 25 वर्षांत विनाकारण कोणासोबत वाद केला नाही. तुमचा नेता मुंबईहून येतो पण आमचा कार्यकर्ता दोन्ही पाय नसताना पुण्याहून येतो लक्षात ठेवा. या सभेसाठी खुर्च्या लावल्या असत्या तर मैदान कमी पडलं असतं. आमचे कार्यकर्ते जातीपातीचे बंधन तोडून काम करीत असल्याचं बच्चू कडू यावेळी म्हणाले आहेत.
भलतंच घडलं..! लाइव्ह रिपोर्टिंग दरम्यान पत्रकारची घसरली जीभ; फजितीचे ‘शब्द’ ऐकून चॅनेलचा माफीनामा…
दरम्यान, 23 आणि 24 एप्रिलसाठी अमरावतीच्या सायन्स कोर मैदानात बच्चू कडू हे आपले उमेदवार दिनेश बुब यांच्या प्रचारासाठी सभा घेणार होते. त्यासाठी रितसर निवडणूक आयोगाकडून परवानगी देण्यात आली होती. मात्र, सुरक्षेचे कारण देत कडू यांची सभा रद्द करत तेथे अमित शाह यांच्या सभेला परवानगी दिली आहे. त्यामुळे प्रचंड संताप व्यक्त करत बच्चू कडू यांनी पोलिसांसमोरच आंदोलन पुकारलं होतं. यावेळी मोठा राडा झाल्याचं दिसून आलं होतं.