भलतंच घडलं..! लाइव्ह रिपोर्टिंग दरम्यान पत्रकारची घसरली जीभ; फजितीचे ‘शब्द’ ऐकून चॅनेलचा माफीनामा…

भलतंच घडलं..! लाइव्ह रिपोर्टिंग दरम्यान पत्रकारची घसरली जीभ; फजितीचे ‘शब्द’ ऐकून चॅनेलचा माफीनामा…

पत्रकारितेत बातमीदारीचं काम सगळ्यात अवघड. प्रिंट मीडियातील पत्रकारितेच्या तुलनेत टीव्हीवरील रिपोर्टिंग, ऑन एअर रिपोर्टिंग काही बाबतीत कठीण ठरते. कारण, एखाद्या घटनेची माहिती देताना विचार करावा लागतो त्यानुसार काही प्रतिक्रिया द्याव्या लागतात. पण, बऱ्याचदा असे प्रसंग येतात ज्यावेळी पत्रकारांकडून चुका होतात. पण, त्यावेळी तोंडातून निघालेले शब्द पुन्हा मागे घेता येत नाहीत. संबंधित पत्रकारासाठी ही चूक त्रासदायक ठरते तर कधी मनोरंजकही ठरू शकते. अशीच एक घटना एका टीव्ही न्यूज रिपोर्टरच्याबाबतीत घडली.

या टीव्ही न्यूज चॅनेलच्या अश्मित नावाचा एक पत्रकार पतंजली प्रकरणात रिपोर्टिंग करताना एक चूक करून बसला. या पत्रकाराने निराश होत ऑन एअर रिपोर्टिंग दरम्यानच शिवी दिली. विशेष म्हणजे या पत्रकाराला हे माहिती होतं की आपण लाइव्ह रिपोर्टिंग करत आहोत. तरी देखील त्याने या गोष्टीचा विचार केला नाही.

यानंतर त्याने झालेली चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली. परंतु, तोपर्यंत वेळ निघून गेली होती. पण, वेळ तर मारुन न्यायची होती ना. मग या पत्रकाराच्या मदतीला न्यूज अँकर धावला. पत्रकाराच्या वक्तव्याला मध्येच कात्री लावत आपण थोड्या वेळाने त्या मुद्द्यावर येऊ, तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाही असे म्हणण्यास सुरुवात केली.

या प्रकारावर नंतर चॅनेलने माफी मागितली. एक्सवर एक पोस्टा लिहिली. आज थेट प्रक्षेपणादरम्यान एक पत्रकाराकडून अजाणतेपणाने अयोग्य भाषेचा वापर केला गेला. त्याला हे माहित नव्हतं की आपण ऑन एअर आहोत. या चुकीबद्दल आम्ही अगदी प्रामाणिकपणाने माफी मागत आहोत, असे न्यूज चॅनेलने या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Lok Sabha Election : माधुरी दिक्षित अन् शेलारांचा नकार, भाजपसाठी उज्ज्वल निकम पर्याय?

कॅमेऱ्यासमोरही चुका होतात. त्यात नवीन काही नाही. पण ही घटना काही वेळातच व्हायरल झाली. काही वेळेस चुका होतात. या गोष्टी शक्यतो जाणूनबुजून केलेल्या नसतात. परंतु, या गोष्टी जितक्या लवकर व्हायरल होतात तितक्याच लवकर विसरल्याही जातात. असा जो कुणी व्यक्ती असेल ज्याने कधी ना कधीतरी कॅमेऱ्यासमोर अशा चुका केल्या असतील त्याला एक गोष्ट पक्की ठाऊक असते की ऑन एअर बोललेल्या गोष्टी कायमस्वरुपी राहतात. तेव्ही काळजी घेणेच चांगले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube