Patanjali case : रामदेवबाबा, बाळकृष्ण आचार्य ‘जाहीर माफी’साठी तयार; SC ने दिला सात दिवासांचा वेळ

Patanjali case : रामदेवबाबा, बाळकृष्ण आचार्य ‘जाहीर माफी’साठी तयार; SC ने दिला सात दिवासांचा वेळ

Patanjali case Ramdeo Baba ready for public apology Supreme Court gives 7 days : दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून ( Supreme Court ) अद्याप देखील पतंजलीला दिलासा मिळालेलाच नाही. आज झालेल्या सुनावणीमध्ये देखील न्यायालयाने रामदेव बाबांचं ( Ramdeo baba) माफीपत्र ( apology ) स्विकारण्यास नकार दिला. मात्र आता रामदेव बाबा आणि आचार्य बाळकृष्ण या प्रकारणी जाहिर माफी मागायला तयार असल्याचे त्यांच्या वकीलांनी सांगितले आहे. त्यावर कोर्टाने त्यांना सात दिवसांचा अवधी दिला आहे. त्यामुळे या प्रकरणावर पुढील सुनावणी 23 एप्रिलला पार पडणार आहे. तेव्हा पुन्हा एकदा रामदेव बाबांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पक्षांतराचा श्रीगोंदा पॅटर्न! कुणाच्या पारड्यात पडणार वजन, दिग्गजांच्या पक्षांतराने बदललं लढतीचं गणित

दरम्यान गेल्या वेळी देखील सर्वोच्च न्यायालयाने ( Supreme Court ) पतंजली आयुर्वेद कंपनीचे ( Patanjali Ayurveda Company) चे दुसरे माफीपत्र ( affidavit of apology ) देखील फेटाळले होते. तसेच कोर्टाने दिशाभूल करणाऱ्या जाहिरात प्रकरणी कारवाईला सामोरे जाण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे अखेर पतंजलीला या प्रकरणामध्ये कारवाईला सामोरं जावं लागणार हे स्पष्ट झालं होतं.

मोठी बातमी : साताऱ्यात शिंदे विरूद्ध भोसले लढत होणार; भाजपकडून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी

काय आहे प्रकरण?

बाबा रामदेव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोविड-19 च्या लसीकरण आणि आधुनिक औषधांविरोधात बदनामीची मोहीम चालवल्याचा आरोप करून इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) 2022 मध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. अॅलोपथीची विश्वासार्हता कमी करण्याचा प्रयत्न रामदेव बाबांच्या जाहिरातींमधून होत होता. यावर न्यायालयानेही त्यांना प्रश्न विचारले होते. त्यानंतर नोव्हेंबर 2023 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने पंतजलीला त्यांच्या उत्पादनांविषयी आणि त्यांच्या परिणामकारकतेविषयी फसवे दावे बंद करण्यास सांगितले होते, तसेच प्रत्येक दाव्यामागे एक कोटी दंड आकारण्याचा इशाराही दिला होता.

त्यावर सर्वोच्च न्यायालयाने 2023 मध्ये पतंजली आयुर्वेद कंपनीला आदेश देत दिशा भूल करणाऱ्या जाहिरातींना माघारी घेण्याचे आदेश दिले होते आणि जर कंपनीने असं केलं नाहीतर यावर आम्ही कारवाई करून कंपनीच्या प्रत्येक चुकीच्या जाहिरातींवर एक कोटी रुपयांचा दंड आकारण्यात येईल असं सांगितले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube