Nana Patole On Sanjay Raut : महाविकास आघाडीच्या (mahavikas aghadi)लोकसभा जागावाटपाबद्दल (seat allocation)कॉंग्रेस(Congress), शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena Thackeray group)आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातील (Nationalist Congress Sharad Pawar group)नेत्यांकडून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यातच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)यांनी कॉंग्रेसची अधिकृत भूमिका जाहीर केली आहे. कॉंग्रेसची 29 डिसेंबरला बैठक होणार आहे. त्यानंतर जागावाटपाचा निर्णय होणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले. त्यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला.
मोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भात मोठा दिलासा; SC नं क्युरेटिव्ह याचिका स्वीकारली
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लोकसभा जागावाटपाबद्दल 20 जागांवर ठाकरेंची शिवसेना लढणार असल्याचे सांगितले. त्यावर नाना पटोले म्हणाले की, असा कोणताही निर्णय झाला नाही. सुरुवातीला कॉंग्रेसच्या स्तरावर निर्णय होणार असल्याचे पटोले यांनी सांगितले. आणखी कॉंग्रेसचा काही गोष्टींवर निर्णय झाला नाही. त्यामुळे मेरीटच्या आधारावर निर्णय होईल असेही यावेळी नाना पटोले यांनी सांगितले.
आता काय फासावर लटकू का? कुस्तीपटूंच्या विरोधानंतर ब्रिजभूषण सिंह यांचा संताप
त्याचबरोबर जागेंच्या बाबतीत प्रश्न विचारला असता, त्यावर पटोले यांनी सांगितले की, ज्या जागांवर ज्या पक्षाचा जोर असेल त्या ठिकाणी तो पक्ष लढेल असेही त्यांनी सांगितले. अशा पद्धतीचा सर्व्हे सगळ्यांकडेच आहे.
तसेच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी 20 जागांवर केलेल्या दाव्यावर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, संजय राऊत यांना बोलायची सवय आहे त्यामुळे त्यांच्यावर मी काही प्रतिक्रिया देणार नाही. असेही यावेळी नाना पटोले यांनी सांगितले.