Download App

फहीम खाननं लिहिली नागपूर हिंसाचाराची स्क्रिप्ट; राड्याच्या FIR मध्ये नेमकं काय काय?

Nagpur Violence : औरंगजेबाच्या कबरी विरोधात 17 मार्च रोजी नागपुरात बजरंग दल (Bajrang Dal) आणि विश्व हिंदू परिषदेकडून (VHP) आंदोलन करण्यात आले

  • Written By: Last Updated:

Nagpur Violence : औरंगजेबाच्या कबरी विरोधात 17 मार्च रोजी नागपुरात बजरंग दल (Bajrang Dal) आणि विश्व हिंदू परिषदेकडून (VHP) आंदोलन करण्यात आले होते मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागले. दोन गटात तुफान राडा झाला आणि या राड्यात पोलिसांवर देखील दगडफेक करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत 45 पेक्षा जास्त लोकांना अटक केली आहे तर आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.

या बातमीनुसार या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये (FIR)  या प्रकरणातील मास्टरमाईंड असणाऱ्या व्यक्तीचा उल्लेख करण्यात आला आहे. एफआयआरनूसार, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाच्या कबरी विरोधात घोषणाबाजी केली होती आणि त्यानंतर फहीम खान (Faheem Khan) नमाक व्यक्तीने परिसरात जमाव जमावल्याचा उल्लेख एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. एफआयआरनुसार फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पक्षाचा शहर अध्यक्ष तो पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्यासाठी गेला होता.

त्याने दिलेल्या निवेदनानुसार, पोलिसांनी 9 जणांविरुद्ध कलम 223 आयपीसी अंतर्गत, भारतीय दंड संहितेच्या कलम 37(1), 37(3) आणि 135 अंतर्गत हा गुन्हा दाखल केला होता. तसेच लोकांना शांतता राखण्याच्या सूचनाही पोलिसांनी दिलेल्या होत्या. तर दुसरीकडे नागपूर हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत आतापर्यंत 46 जणांना अटक केली आहे.

सुनीता विल्यम्स अवकाशातून पाहत होती महाकुंभ, लवकर येणार भारतात, कुटुंबाने दिली महत्वाची माहिती

तर न्यायालयाने त्यांना 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आता महाराष्ट्र एटीएस देखील तपास करणार आहे. महाराष्ट्र एटीएसच्या तपासात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नेमकं काय घडलं?

या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशपेठ आणि महाल परिसरात 17 मार्च रोजी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्याकडून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर औरंगजेबाची कबर हटवण्याच्या अनुषंगाने आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी औरंगजेबाचा फोटो आणि औरंगजेबाची प्रतिकात्मक कबरेवरील हिरव्या रंगाची चादर जाळली आणि याचे काही फोटो सोशल मीडिायावर व्हायरल करण्यात आले. तर रात्री सात वाजता विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नारेबाजी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी रात्री साडेआठच्या सुमारास त्यांना आंदोलन बंद करण्यास भाग पाडले.

तर चिटणीस पार्क चौकाकडून रात्री आठच्या सुमारास एक गट आला आणि या गटाकडून हिरव्या चादरीबाबत आक्षेप घेण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी परिस्थिती लक्षात घेत परिसरात पोलिसांचा मोठा ताफा तैनात केला. तर साडेआठच्या सुमारास दोन्ही गटांकडून नारेबाजी करण्यात आली आणि त्यामुळे वाद चिघळला. यानंतर पोलिसांनी परिसरातील दुकाने बंद करण्यास भाग पाडले.

नागपूर का पेटलं? ‘कबरीचा वाद, पोलिसांवर दगडफेक’ काय-काय घडलं, वाचा सविस्तर…

दुकाने बंद केल्यामुळे एकच गोंधळ उडाला आणि त्यानंतर दोन्ही गटाकडून दगडफेक करण्यास सुरुवात झाली. रात्री 8.40 पासून वाजतापासून दंगल उसळली आणि पोलिसांनी रात्री नऊपासून कोम्बींग ऑपरेशनला सुरूवात केली.

follow us