Sangharsh Yatra : जळगाव-नागपूर अशी कापसाच्या दरासाठी आम्ही दिंडी काढली होती. त्यावेळेचे राज्यकर्ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देत नव्हते. त्या दिंडीत नागपूरमध्ये हजारोंच्या संख्येने कष्टकरी लोक एकत्र आले होते. त्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बाजूला व्हावं लागलं. आज तरुणांनी कार्यक्रम हाती घेतला. त्या कार्यक्रमाच्या (Sangharsh Yatra) माध्यामातून त्यांनी सरकारला इशारा दिलाय. बाबांनो, ह्या मागण्या आम्ही सहकार्य आणि सामंजस्याने केल्या आहे. त्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं तर ही युवा शक्ती नवा इतिहास निर्माण केल्याशिवाय राहाणार नाही. हा राज्य सरकारला इशारा आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जळगावपासून नागपूरपर्यंत आम्ही यात्रा काढली होती. त्या यात्रेत यशवंतराव चव्हाण सहभागी झाले होते. त्यावेळी आम्हाला अटक केली आणि एसटीने घेऊन गेले. त्यावेळी मी त्यांना विचारले की तुम्ही शेवटचं एसटीत कधी बसला होता? तेव्हा ते म्हणाले की एसटीची स्थापना झाली तेव्हा बसलो होतो. त्यानंतर आज बसलोय. त्यामुळे काही यात्रा इतिहास घडवतात, असे शरद पवार यांनी सांगितले.
संबंध देशाचा इतिहास पाहिला तर अशाप्रकारचा कार्यक्रम दोन लोकांनी घेतला आणि राबवला. एक राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि दोन माजी पंतप्रधान चंद्रशेखर. या राष्ट्रीय नेत्यांकडून प्रेरणा घेऊन ह्या यात्रेचे आयोजन केले. ही यात्रा तरुणांच्या प्रश्नांसाठी होती. यामध्ये पदभरती, कंत्राटी कामगार, सरकारी रिक्त जागा असे अनेक प्रश्न आहेत. हे प्रश्न तरुण पिढीसमोर आवासून उभा आहेत. हे प्रश्न हातात घेऊन ही यात्रा नागपूरपर्यंत आली, असे शरद पवार यांनी म्हटले.
बाजू कमकुवत झाली म्हणून खोट्या अफवा पसरवल्या, केसरकरांकडून अनिल परबांना प्रत्त्युत्तर
हे सर्व करत असताना महाराष्ट्राचा, जिल्ह्याचा, तालुक्याचा आणि गावाचा विकास आणि त्यासाठी गुंतवणुक या गोष्टीकडे लक्ष दिले. या देशात काळ्या आईशी इमान राखलेला शेतकऱ्यांची संकटातून सुटका करण्यासाठी अनेक कार्यक्रम या संघर्ष यात्रेच्या माध्यमातून हाती घेतले
आहेत, असे शरद पवार यांनी म्हटले.
पहिल्यांदाच आमदार अन् राजस्थानचे मुख्यमंत्री झालेले भजनलाल शर्मा आहेत तरी कोण?
अलिकडच्या काळात आरक्षणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, लिंगायत आरक्षण, मुस्लीम आरक्षण या सर्वांच्या संदर्भात नव्या पिढीला आशावाद देण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकारची आहे. सरकार ते पार पडत नसेल तर त्यांना जागे करण्यासाठी ही संघर्ष यात्रा आहे, असे शरद पवार यांनी म्हटले.