बाजू कमकुवत झाली म्हणून खोट्या अफवा पसरवल्या, केसरकरांकडून अनिल परबांना प्रत्त्युत्तर

बाजू कमकुवत झाली म्हणून खोट्या अफवा पसरवल्या, केसरकरांकडून अनिल परबांना प्रत्त्युत्तर

Deepak Kesarkar on Anil Parab : ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांनी मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी कोणतेही लोकशाहीचे तत्त्व पाळले नाहीत, ते मनमानी करत होते, त्यांनी कोणत्याही निवडणुका घेतल्या नाहीत, असे उलट साक्षीत केसरकरांनी सांगितल्याचा आरोप अनिल परब यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांचे खंडन दीपक केसरकर यांनी केलं आहे.

यावर दीपक केसरकर म्हणाले की त्यांनी केलेले आरोप खोटे आहेत. मी दिलेली मुलाखत प्रिटेंड स्वरुपात आहे. त्यात असं एक वाक्य देखील नाही. समोरच्या बाजूच्या साक्षी झाल्यानंतर आपली बाजू कमकुवत आहे हे लक्षात आल्यानंतर अशा खोट्या अफवा उठवल्या जातात. मी असे काही बोललो असेल तर त्यांनी दाखवून द्याव, असे आव्हान दीपक केसरकर यांनी अनिल परब यांना दिले आहे.

दिशा सालियान मृत्यू प्रकरण : ठाकरे-फडणवीस राजकीय सूडनाट्य, अंक पाचवा!

ते पुढं म्हणाले की आतापर्यंत मी जाहीर भाषणातून दोनच व्यक्तीचं कौतुक केलं आहे. एक शरद पवार आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे. हे माझ्या साक्षीत आले आहे. त्यामुळे विनाकारण काहीतरी पसरवायचे हे योग्य नाही. मला बाळासाहेबांबद्दल नेहमी आदर राहिलेला आहे. मी स्वप्नात देखील असे बोलू शकत नाही.

मोठी बातमी : विधानसभांपूर्वी जुन्या पेन्शन योजनेबाबत सकारात्मक निर्णय घेणार; अजितदादांचं आश्वासन

मला नरेंद्र मोदींनी दिल्लीला बोलवलं होतं. पण त्यांना न भेटता माघारी आलो होतो. कारण बाळासाहेबांबद्दल आकर्षण होतं. उद्धव ठाकरेंनी स्वत: फोन केला होता. त्यामुळे मिळणारं कॅबिनेट खातं सोडून मी आलो आणि राज्यमंत्री झालो, असे दीपक केसरकर यांनी सांगितले.

एकदा उद्धव ठाकरे म्हणाले होते की भाजप-सेनेच सरकार आलं तर तुम्ही त्यात मंत्री बनाल. पण त्यावेळी मी त्यांना सांगितलं की तुमच्या मंत्रीमंडळात कधीही मंत्री म्हणून येणार नाही. कोकणातील नेत्यांकडून अपमान करुन मला मंत्रिपद नको होतं. एकनाथ शिंदे प्रेमाची वागणूक देतात म्हणून मी त्यांच्याबरोबर राहिलो, असे दीपक केसरकर यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube