Download App

इव्हेंटबाज सरकार! जिवतंपणी होत असलेल्या मरण यातना प्रत्यक्ष जाऊन बघा…; वडेट्टीवारांचे टीकास्त्र

जिवंतपणी त्यांना मिळत असलेल्या मरण यातना एकदा या इव्हेंटबाज सरकारने प्रत्यक्ष जाऊनही बघाव्या, अशी टीका वडेट्टीवारांनी केली.

  • Written By: Last Updated:

Vijay Wadettiwar : गडचिरोली (Gadchiroli) दोन चिमुकल्या भावडांना ताप आला आणि त्यानंतर काही तासांच्या अंतराने त्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली. रुग्णालयातून मृतदेह घरी घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका नव्हती. त्यामुळे आई-वडिलांनी दोन्ही भावंडांचे मृतदेह खांद्यावर घेऊन जड पावलांनी 15 किलोमीटर पायपीट करत घर गाठले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी महायुती (Mahayuti) सरकारवर जोरदार टीका केली.

Gautami Patil: गौतमी पाटीलची बिग बॉसमध्ये होणार वाईल्ड कार्ड एन्ट्री? 

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, तर ही घटना मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या मतदारसंघात घडली. यावरून वडेट्टीवार यांनी टीका केली. गडचिरोली जिल्ह्यात लोक कसे जगतात? जिवंतपणी त्यांना मिळत असलेल्या मरण यातना एकदा या इव्हेंटबाज सरकारने प्रत्यक्ष जाऊनही बघावं, अशी टीका त्यांनी केली.

शिवरायांचा पुतळा दुर्घटना प्रकरण! क्षमा तोच मागतो जो चुकतो; राहुल गांधींनी जखमेवर मीठ चोळलं 

वडेट्टीवार यांनी एक्सवर या घटनेचा व्हिडिओ शेअर करत एक पोस्ट लिहिली. त्यात त्यांनी म्हटलं की, दोन्ही लेकरांचे मृतदेह खांद्यावर घेऊन चिखलातून वाट शोधतपुढे जात असलेले हे दाम्पत्य गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील आहे. आजोळी आलेल्या दोन भावडांना ताप आला. त्यांना वेळेवर उपचार मिळाले नाहीत. दोन तासांतच दोघांचीही प्रकृती खालावली आणि दीड तासाच्या अंतराने दोघांनीही अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयातून मृतदेह घरी घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका नव्हती. आई-वडिलांनी दोन्ही भावंडांचे मृतदहे खांद्यावर घेतले. चिखलातून वाट शोधत 15 किमी अंतरावरचे अहेरी तालुक्यातील पत्तीगाव पायीच गाठले. या घटनेमुळं गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेचे एक भीषण वास्तव आज पुन्हा पुढं आल्याचं वडेट्वीवार म्हणाले.

ते म्हणाले, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. हेलिकॉप्टरने विधानसभा मतदारसंघ पिंजून काढणारे महायुतीतील कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा हा मतदारसंघ. दोघेही महाराष्ट्रभर रोज इव्हेंट घेऊन आम्हीच कसा विकास करू शकतो, हे सांगत असतात. दोघांनीही एकदा जमिनीवर उतरून आपल्या गडचिलोरी जिल्ह्यात लोक कसं जगतात, जिवंतपणी त्यांना मिळत असलेल्या मरण यातना एकदा या इव्हेंटबाज सरकारने प्रत्यक्ष जाऊनही बघावे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

follow us