गडचिरोलीत पोलिसांकडून नक्षलवाद्यांचा खात्मा! 12 जणांना कंठस्नान

गडचिरोलीत पोलिसांकडून नक्षलवाद्यांचा खात्मा! 12 जणांना कंठस्नान

Gadchiroli Naxal Attack : गडचिरोलीमध्ये पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक (Gadchiroli Naxal Attack) झाल्याची माहिती समोर आली आहे. या चकमकीमध्ये पोलिसांच्या कारवाईत 12 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. गडचिरोलीत सकाळी 6 वाजल्यापासून नक्षलवाद्यांसोबत पोलिसांकडून चकमक सुरु होती. या चकमकीत स्वयंचलित शस्त्रे जप्त करण्यात आले आहेत.

काँग्रेसने प्रकाश आंबेडकरांविरोधात उमेदवार उतरविला ! अकोल्यातून डॉ. अभय पाटलांना उमेदवारी

गडचिरोलीतील कोरचोली आणि गांगलूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिस आणि नक्षलवाद्यांत चकमक झाली आहे. कोरचोलीत आठ नक्षलवादी ठार झाले आहेत. गांगलूर पोलिस हद्दीत अद्यापही चकमक सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे. या चकमकीत जंगलातून INSAS, LMG, Ak47 अशी स्वयंचलित शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांच्या तुकड्या अद्यापही जंगलातच नक्षलवाद्यांचा शोध घेत असून पोलिसांकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

Bhumi Pednekar: ‘फीमेल लीड प्रोजेक्ट’ हा शब्द मला अजिबात आवडत नाही’, अभिनेत्री थेटच बोलली

कसनसूर चातगाव दलम आणि छत्तीसगडच्या औंधी दलमचे काही सशस्त्र कॅडर मोहल्ला मानपूर जिल्ह्यातील चुटीनटोला गावाजवळ (एसपीएस पेंढरीपासून 12 किमी पूर्वेला) MH CG बॉर्डरवर तळ ठोकून असल्याची माहिती मिळाली होती. आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विध्वंसक कारवाया करण्यासाठी त्यांची रणनीती असल्याचं समोर आलं.

दरम्यान, शनिवारी पोलिस आणि सुरक्षा दलाच्या तुकड्या 450 मीटर उंच टेकडीवर पोहचल्यानंतर त्या ठिकाणाहुन नक्षलवादी नूकतेच निघाले होते. डोंगरमाथ्यावरील शोधाच्या ठिकाणी एक मोठी नक्षलांची छावणी पोलिसांना आढळून आली होती. पोलिसांनी ही छावणी नष्ट केल्यानंतर शोध मोहिम राबवण्यात आली होती. त्यानंतर डोंगर आणि जंगलांचा फायदा घेऊन नक्षलवादी पळून गेले होते. ही शोध मोहिम अतिरिक्त पोलिस अधीक्षक ऑपरेशन्स यतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube