Weather Update : राज्यात पावसाने दणक्यात कमबॅक केलं असून अनेक जिल्ह्यांना (Wather Update) झोडपून काढलं आहे. पुणे मुंबईला जोरदार (Mumbai Rains) पावसाचा तडाखा बसला आहे. हा पाऊस आणखीही काही दिवस सुरुच राहणार असल्याची चिन्हे आहेत. यातच आता हवामान विभागाने (Heavy Rain) पावसाबाबत नवा इशारा दिला आहे. आज राज्यात अनेक ठिकाणी जोरदार (IMD Rain Alert) पाऊस होईल असा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज कोकण, मध्य महाराष्ट्रात ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, धुळे, सातारा, पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नंदूरबार, नाशिक, नगर, पुणे, सोलापूर या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
सावधान! आज राज्यात मुसळधार, हवामान विभागाचा ‘या’ भागात यलो अलर्ट जारी
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भातील अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांनाही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आज दिवसभरात या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होईल. तेव्हा नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, राज्यात पावसाने मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतली होती. काही भागात मात्र तुरळक सरी बरसत होत्या. राज्यात अनेक ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र मागील दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्याच्या सरासरीचा पावसाचा आकडा पार झाला आहे. मुंबईतील पावसानं सरासरी हजार मिमीचा टप्पा ओलांडला आहे. तर, जुलै महिन्याची सरासरी अवघ्या 14 दिवसांत पूर्ण करण्यात आली आहे. जुलै मध्यपर्यंतच पावसानं जुलै महिन्याच्या सरासरी एवढ्या पावसाचा टप्पा पार केला आहे.
अतिवृष्टीमुळे धरणांतून विसर्ग, मात्र पाऊस अन् धरणसाठ्याचं गणित नेमकं काय? जाणून घ्या सविस्तर