सावधान! आज राज्यात मुसळधार, हवामान विभागाचा ‘या’ भागात यलो अलर्ट जारी
Weather Update : राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती (Weather Update) घेतली आहे. काही ठिकाणी तुरळक स्वरुपात पाऊस होत आहे. आता मात्र पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले असून मुसळधार पावसाची (Heavy Rainfall) चिन्हे दिसत आहेत. हवामान विभागाने आज राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाचा इशारा दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
राज्यात पावसाने मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतली होती. काही भागात मात्र तुरळक सरी बरसत होत्या. राज्यात अनेक ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र मागील दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्याच्या सरासरीचा पावसाचा आकडा पार झाला आहे. मुंबईतील पावसानं सरासरी हजार मिमीचा टप्पा ओलांडला आहे. तर, जुलै महिन्याची सरासरी अवघ्या 14 दिवसांत पूर्ण करण्यात आली आहे. जुलै मध्यपर्यंतच पावसानं जुलै महिन्याच्या सरासरी एवढ्या पावसाचा टप्पा पार केला आहे.
जुलै महिन्यात राज्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला होता. मात्र ऑगस्ट महिना उजाडला तसा पावसाने ब्रेक घेतला. मुंबई उपनगरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होत होता. पाऊस कमी झाल्याने अनेक ठिकाणी पुन्हा उकाडा जाणवू लागला आहे. मुंबई, ठाणे, पालघर या भागात हलक्या स्वरुपाचा पाऊस होईल अशी शक्यता आहे. या काळात हवामान ढगाळ राहिल. काही भागात पाऊस होईल तर काही ठिकाणी हवामान कोरडे राहिल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या भागातील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासन आणि हवामान विभागाने केलं आहे.
Weather Update : अतिमुसळधार पावसाचा इशारा; IMD कडून ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी